डोळे दुखणे म्हणजे काय?
डोळे दुखणे, म्हणजेच ओप्थल्मल्जिया हा डोळ्यांना होणारा एक प्रकारचा त्रास आहे. हा त्रास किंवा वेदना ऑक्युलर (डोळ्याच्या पृष्ठभागावर) किंवा ओर्बिटल (डोळ्याच्या आत) असू शकतो. ह्या वेदना डोळ्याला इजा झाल्याने अचानक उद्भवणार्या किंवा अलर्जीक रिअॅक्शनमुळे होणार्या किंवा बरेच दिवसापासून झालेल्या डोळ्यांच्या संसर्गामुळे होणार्या असू शकतात किंवा जास्त गंभीर प्रकाराच्यासुद्धा असू शकतात. दृष्टी जाण्याची मोठी शक्यता असल्यामुळे एखाद्या योग्य डॉक्टरकडून डोळेदुखी वेळीच तपासून घेतली पाहिजे.
याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
डोळे दुखणे हे एक लक्षण आहे ज्याच्या जोडीला इतर अनेक चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात:
- दृष्टीमध्ये अडथळा.
- तीव्र वेदनांमुळे लहान मुले रडतात.
- ताप.
- डोळे बाहेर येणे.
- दृष्टीतील स्पष्टता कमी होणे.
- उलट्या.
- खोकला आणि नाक वाहणे.
- पसचा स्त्राव.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
बर्याच वेळा संसर्गामुळे किंवा इजेमुळे डोळे दुखतात. डोळे दुखण्याची काही इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- अॅलर्जी.
- अश्रु नलिकेत अडथळा.
- डोकेदुखी.
- आयरिसची चुरचुर होणे.
- डोळ्याचा पांढरा भाग चुरचुरणे.
- स्टाय.
- कंजंक्टीव्हायटीस.
- ग्लॉकोमा – डोळ्यातील प्रेशर वाढणे.
- कॉर्निया चुरचुरणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वर दिलेल्यापैकी कोणतेही लक्षण तुमच्या अनुभवास आल्यास तुम्हाला डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे असे समजा.
- व्यवस्थित निदान करण्यासाठी आणि डोळे दुखण्याचे कारण समजून घेण्यासाठी डॉक्टर तुमच्या डोळ्यांची तपासणी करतील.
- ते डोळ्यांची स्लीट लॅम्प परीक्षा करतील ज्यामुळे त्यांना डोळ्याच्या आतला भाग विस्तृतरीत्या दिसू शकेल.
डोळे ज्या प्रमाणात दुखत आहेत त्या प्रमाणे डॉक्टर काळजी घेण्याचे विविध उपाय सुचवतील ज्यामुळे डोळे दुखणे काही प्रमाणात कमी होईल. त्यापैकी काही उपाय म्हणजे:
- ओव्हर दी काऊंटर वेदनाशामके वापरुन सतत होणार्या वेदना कमी केल्या जातात.
- सिलियरी स्नायुमध्ये होणारे आकुंचन टाळण्यासाठी आय ड्रॉप्स दिले जातात. ह्याच्यामुळे डोळ्याचा लालसरपणा आणि वेदना कमी होतात.
- संसर्ग बरा होण्यासाठी अॅंटीमायक्रोबियल आय ड्रॉप्स दिले जातात.
- डोळ्यांची चुरचुर कमी करण्यासाठी स्टेरोईड आय ड्रॉप्स दिले जातात.