सारांश
चरबीयुक्त यकृताचा विकार हा एक असा आजार आहे ज्यात यकृतामधे अती प्रमाणात चरबी जमा होते. हा दोन प्रकारांत विभागला गेला आहे.अत्यधिक मद्यापानाने यकृतात चरबी जमा होऊन झालेला आजार,आणि मद्यपान न करता ही यकृतात चरबी जमा होण्यामुळे झालेला आजार (एनएएफएलडी). एनएएफएलडीचे अचूक कारण अज्ञात आहेत.तथापि, ते इंसुलिन प्रतिरोधक आणि चयापचयनाच्या विकारांशी संबंधित आहे. एनएएफएलडी ही पाश्चात्य जगावर परिणाम करणारी सर्वात सामान्य यकृत अवस्था आहे. हा आजार वाढत्या यकृता व्यतिरिक्त इतर कोणत्याही लक्षणांशिवाय अस्तित्वात असू शकतो, किंवा अचानक गंभीर लक्षणे दिसू शकतात ज्यासाठी तत्काळ वैद्यकीय सेवा आवश्यक आहे.कधी कधी यकृत पूर्णपणे बंद होण्याचे संकेत मिळतात. आजाराच्या प्रगतीस प्रतीबंध,प्रगतीवरील ताबा मिळविण्यासाठी आणि पूर्वीच्या स्थितीत आणण्यासाठी, वेळेवर निदान आणि सेवा मिळणे महत्वाचे आहे. वर्तमानकाळात उपचारांचा हेतू वजन कमी करून आणि व्यायामाच्या मदतीने यकृताच्या आरोग्याचे व्यवस्थापन करण्याचा असतो. अनेक साहाय्यक औषधे येऊ घातले असून या आजारासाठी सध्यातरी कुठलेही मान्यताप्राप्त औषध नाही. अधिक गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रिया आवश्यक आहे.