फ्रॅक्चर्ड बोट म्हणजे काय?
फ्रॅक्चर्ड बोट हे फलांजेस मधील (बोटांच्या हाडांमधील) जखम असते. ही अगदी सामान्यपणे होणारी खेळातील जखम असून ती एखाद्याचे दिवसाचे नियोजन व कामे बिघडवू शकते. वेळीच इलाज न केल्यास त्याचे परिणाम दिसून येतात.
याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
फ्रॅक्चर्ड बोट ची सामान्य लक्षणे व कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- जखमेच्या जागी लालपणा, जळजळ व सूज येणे.
- दुखणे.
- स्पर्श केल्यावर दुखणे.
- आकार बदल.
- बोट हलवताना त्रास होणे.
- फ्रॅक्चर च्या ठिकाणी रक्त साकळणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
फ्रॅक्चर्ड बोट होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- खेळामध्ये झालेली जखम हे फ्रॅक्चर्ड बोट होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.
- दैनंदिन जीवनात देखील जसे दार लावताना किंवा होते भिंतीवर आपटल्यास फ्रॅक्चर्ड बोट होऊ शकते.
- अवजड यंत्रांवर काम करताना, करवत चालवताना किंवा ड्रीलींग मशीन वर काम करताना फ्रॅक्चर्ड बोट होऊ शकतात.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
फ्रॅक्चर्ड बोट चे निदान करताना खालील गोष्टी केल्या जातात:
- जखमेसंबंधीत काळजीपूर्वक घेतलेला वैद्यकीय इतिहास,ज्यात जखमेचा प्रकार, वेळ, लक्षणे व आधीच्या जखमेचा इतिहास डॉक्टर कडून घेतला जातो.
- शारीरिक चाचणीमध्ये फ्रॅक्चर ची जागा, तुटलेल्या हाडांची संख्या व बोटाच्या हालचाली विचारात घेतल्या जातात.
- सांध्यांची स्थिरता व जागा विचारात घेतली जाते.
- निरीक्षणामध्ये हाताच्या तळव्याची व बोटांची एक्स-रे चाचणी अंटरोपोस्टेरिअर, लॅटरल व ऑब्लिक व्ह्यू मधून घेतली जाते.
स्थितीचे उपचार खालीलप्रमाणे:
- फ्रॅक्चर्ड बोट झाल्याच्या उपचारांमध्ये फ्रॅक्चर फ्रागमेंट्स बोटाबरोबर त्याच्या आकारानुसार जोडली जातात व ते बोट इतर बोटांना तात्पुरते जोडले जाते जेणेकरून त्याला लवकर आराम मिळावा व ताण, दुखणे कमी व्हावे. बोटाला किती आधार देण्याची गरज आहे, ते डॉक्टर जखम पाहून मग ठरवतात.
- बोटाच्या हालचाली पूर्णपणे थांबवण्याचा सल्ला दिला जातो.
- उपचार हे सामान्यपणे 3 आठवड्यांसाठी दिले जातात व त्यात ॲनालजेसिक्स व थंड दाब यांचा समावेश असतो.
- तीव्र स्थितींमध्ये शस्त्रक्रिया करावी लागू शकते. जागेवरील फ्रॅक्चर धरुन ठेवण्यासाठी काही साधन लागू शकतात. या मध्ये जैविक साम्य असलेल्या पिन, स्क्रु चा समावेश असू शकतो.