आतड्यातील रक्तस्त्राव म्हणजे काय?
आतड्यातील रक्तस्त्रावामध्ये (जीआय) संपूर्ण पचनसंस्थेमध्ये, तोंडापासून गुदाद्वारापर्यंत कुठेही रक्तस्त्राव होऊ शकतो. हा रक्तस्त्राव कमी प्रमाणात व थोडा वेळ होत असला तरी बरेच वर्ष होऊ शकतो.
याची मुख्य लक्षणे आणि चिन्हे काय आहेत?
आतड्यातील रक्तस्त्रावाचे प्रामुख्याने वर्गीकरण केले जाते ते म्हणजे, आतड्यांच्या वरील भागातील रक्तस्त्राव ज्यामध्ये भडक लाल रंगाच्या उलट्या, काॅफी सारख्या दिसणाऱ्या उलट्या, गडद विष्ठा किंवा रक्त युक्त विष्ठा ही लक्षणे दिसतात; तर आतड्यांच्या खालील भागातील रक्तस्त्रावामध्ये भडक लाल रंगाची विष्ठा किंवा विष्ठेसोबत हेमरॉइडस् मधून होणारा रक्तस्त्राव ही लक्षणे दिसून येतात. ह्यातील रक्तस्रावाशी निगडित लक्षणे व कारणांमध्ये थकवा, त्वचा पांढरी पडणे, ॲनेमिया, हृदयातील कॉम्पिकेशन्स, पौष्टिक तत्वाची कमतरता व पडणे ह्या गोष्टी असू शकतात. आतड्यातील रक्तस्त्राव वेळीच नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे, कारण कोणताही रक्तस्त्राव जीवघेणा ठरू शकतो.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
आतड्याच्या वरच्या भागातील रक्तस्त्राव पुढील कारणांमुळे होतो:-
- अन्ननलिकेतील विविध घटक.
- पोटातील अल्सर.
- अन्ननलिकेतील विजोडता, ज्याला मॅलोरी वीस सिंड्रोम म्हणले जाते.
- अन्ननलिकेचा कर्करोग.
आतड्याच्या खालील भागातील रक्तस्त्राव प्रामुख्याने खालील गोष्टींमुळे होतो:-
- ड्यूडेनल अल्सर.
- क्रोहन आजार.
- अल्सरेटीव्ह कोलायटीस.
- ट्युमर.
- हेमारोईड किंवा पाईल्स.
- गुदाद्वारावरील व्रण.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
रुग्णाच्या वर्तमान व मागील वैद्यकीय तपासण्यांचा अभ्यास करून लक्षणांचे स्वरूप आणि प्रकार समजण्यास मदत होते. यानंतर रक्तस्त्रावाची लक्षणे बघण्यासाठी शारीरिक तपासणी केली जाऊ शकते.
हे सर्व झाल्यानंतर रक्तस्रावाची जागा लक्षात घेऊन विविध चाचण्या करायला सांगितल्या जाऊ शकतात. आतड्याच्या वरच्या भागात रक्तस्त्राव असल्यास एन्डोस्कोपी करायला सांगितली जाऊ शकते, ज्यामुळे डॉक्टर या भागातील अल्सर व इतर विजोडपणा पाहू शकतात. तसेच आतड्याच्या खालील भागातील रक्तस्त्रावाची कारणे शोधण्यासाठी कोलनोस्कोपी केली जाते. इतर चाचण्या जसे, पूर्ण रक्त तपासणी, विष्ठा तपासणी व रुग्णाचे वय लक्षात घेऊन इसीजी काढला जाऊ शकतो.
उपचार हे कारणांवर अवलंबून असतात. रक्ताच्या शिरा कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. पेप्टिक अल्सर साठी पोटातील आम्ल कमी करण्यासाठी प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स दिले जातात. एन्डोस्कोपी मुळे रक्त पुरवठा करणाऱ्या शिरांवर काही क्लिप्स व बँडस् लावून अत्यंत उत्तमरित्या उपचार केला जाऊ शकतो. या सोबतच अती प्रमाणात रक्तस्त्राव झाला असेल तर बाहेरून रक्त पुरवून उपचार केले जाऊ शकतात. हेमरॉईडस् व रेक्टल व्हरायसेस वर शस्त्रक्रिया करून उपचार केला जाऊ शकतो.