हेपेटायटिस ए काय आहे?
हेपेटायटिस ए हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे यकृतावर सूज येते. हा सामान्यपणे 5 वर्षांखालील मुलांमध्ये बघायला मिळतो आणि यात कुठलीही लक्षणं दिसत नाहीत. तरी रोगाचे गांभीर्य, वयाच्या वाढण्यासोबत वाढतच जाते. सामान्यतः, हा संसर्ग अगदी कमी कालावधीसाठीच राहतो आणि क्वचितच मृत्यूचे कारण बनतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 2-4 आठवड्यात या संसर्गाची लक्षणं दिसायला सुरुवात होते.सामान्यतः दिसून येणारी लक्षणे आहेत :
- पिवळ्या रंगाची लघवी.
- पांढऱ्या रंगातून पिवळ्या रंगाचे विलोपण.
- ताप.
- थकवा.
- पातळ मल.
- मळमळ.
- भूक कमी होणे (अधिक वाचा: भूक कमी होण्याची कारणं).
- सांधेदुखी.
क्वचितच हा यकृतावर गंभीर परिणाम करतो ज्यामुळे यकृत निकामी देखील पडू शकते (अधिक वाचा:यकृत निकामी पडण्याची लक्षणं).
याची मुख्य कारणं काय आहेत?
हेपेटायटिस संसर्ग हेपेटायटिस ए व्हायरस (एचएव्ही-HAV) नावाच्या विषाणूने होतो. हे प्रामुख्याने अन्न आणि विषाणू असलेले मल यांच्या संसर्गाद्वारे पसरलेल्या पाण्याने पसरते.
संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पुढील मार्गांनी पसरू शकतो :
- आजारी व्यक्तीकडून तयार केलेले अन्न ग्रहण केल्याने.
- शुद्ध नसलेले पाणी पिल्याने.
- एखाद्या व्यक्तीसोबत वैयक्तिक संपर्क साधल्याने जसे लैंगीक संबंध किंवा त्याने वापरलेल्या वस्तू वापरल्याने.
खोकला, स्पर्श करणे, मिठी घालणे किंवा स्तनपान करणे यापासून देखील तुम्हाला संसर्ग होऊ शकत नाही.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तुमचे डॉक्टर हेपेटायटीस ए संसर्गाचे निदान, तुम्ही अनुभवणाऱ्या लक्षणांवर,शारीरिक तपासणी आणि रक्त चाचणी यांच्या आधारावर करतील. शरीराद्वारे उत्पादित केलेल्या अँटिबॉडीज जे हेपेटायटीस ए विषाणू विरुद्ध लढा देतात ते रक्त चाचणीद्वारे ओळखले जातात. हेपेटायटीस ए संसर्गासाठी निश्चित उपचार नाही, त्याच्या तीव्रतेनुसार फक्त लक्षणांचा उपचार केला जातो. अतिसार आणि उलट्या यांमुळे शरीरातून द्रवपदार्थ कमी झाल्याने त्याची भरपाई करण्यासाठी सामान्य उपचारांमध्ये योग्य विश्रांती आणि भरपूर शुद्ध पाणी पिणे समाविष्ट आहे.
संसर्ग झाल्याच्या काही आठवड्याच्या आतच पुनर्लाभ दिसून येतो. सहसा यकृत निकामी पडल्याच्या स्थितीतच रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला जातो.
तुम्ही स्वत: ला प्रभावित होण्यापासून पुढील मार्गांनी वाचवू शकता:
- शुद्ध पाणी पिणे.
- योग्य प्रकारे स्वच्छ आणि शिजवलेले अन्न खाणे.
- सालपटं काढल्याशिवाय फळे आणि भाज्या घेणे टाळा.
- सुया सामायिक (शेयर) करणे टाळा.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीसोबत संभोग टाळा (अधिक वाचा: सुरक्षित संभोगाच्या पद्धती).
- बालपणातच हेपेटायटीस ए विषाणूसाठी लसीकरण योग्यतेने घेणे.