हाय ट्रायग्लिसरायड्स काय आहे?
ट्रायग्लिसरायड्स हे एक प्रकारचे लिपिड आहे जे तुमच्या रक्तात सापडते. ट्रायग्लिसरायड्स ची पातळी ही स्टॅण्डर्ड कोलेस्ट्रॉल चाचणीच्या चारपैकी एक चाचणी आहे. जास्तीत जास्त आहारातील फॅट्स हे ट्रायग्लिसरायड्स असतात, जे सुरवातीला चरबीच्या पेशीमध्ये जमा होते आणि नंतर रक्ता मधून भिसरण होण्यासाठी शरीरात पसरले जातात. रक्तातील ट्रायग्लिसरायड्स ची पातळी उच्च असेल, तर त्याला हायपरट्रायग्लिसरायड्स म्हणतात, आणि हे शरीरासाठी अपायकारक आहे.
याच्याशी संबंधित मुख्य खुणा आणि लक्षणं काय आहे?
सामान्यतः, ट्रायग्लिसरायड्स च्या उच्च पातळीचे काही ठळक लक्षणे नाही आहे:
तरीही, ते काही रोग होण्याचा संभावित धोका दर्शवते:
- अर्टेरिओसकलेरॉसिस - रक्त वाहिन्या अरुंद आणि कडक होणे.
- कोरोनरी हृदय रोग - हृदयाच्या रक्त वाहिन्या कडक आणि अरुंद होते.
- स्ट्रोक - मेंदूचा रक्त संचार बंद होतो.
- पॅनक्रियाटायटिस, ज्यामध्ये पोटात तीव्र स्वरूपाचे वेदना होते.
याचे मुख्य कारणं खालील प्रमाणे आहेत?
हाय ट्रायग्लिसरायड्स ची विविध घटकांमुळे खालील परिस्थिती होते:
- लठ्ठपणा.
- अनियंत्रित मधुमेह.
- कमीक्रीयाशील थायरॉईड.
- जठर आणि मूत्रपिंडाचे रोग.
- अनुवांशिक प्रभाव.
- दररोज गरजेपेक्षा जास्त कॅलोरीज चे सेवन करणे.
- बैठी जीवनशैली.
- जास्त प्रमाणात मद्यपान करणे.
- धूम्रपान.
- डाययुरेटिकस सारखे औषधे (शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढते), स्टिरॉइड्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि इम्युनोसप्रेसंट( इम्यून सिस्टीम ला दाबणारी औषधे).
- ज्या महिला हार्मोनल थेरपी घेत आहे किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिन्ड्रोम चा ज्यांना त्रास आहे त्या महिलांमध्ये ट्रायग्लिसरायड्स ची पातळी वाढण्याचा धोका जास्त आहे .
याचे निदान आणि उपचार काय आहे?
- ट्रायग्लिसरायड्स ची उच्च पातळी च्या निदानासाठी वैद्यकीय इतिहास आणि इतर तपासण्या केल्या जातात.
- लिपिड प्रोफाइल टेस्ट ही तुमच्या रक्तातील ट्रायग्लिसरायड्स ची उच्च पातळीच्या निदानासाठी आणि तपासण्यासाठी सुचवली जाते. १५० एमजी /डी एल च्या खाली ट्रायग्लिसरायड्स ची पातळी असेल तर ती नॉर्मल समजली जाते.
- तुमचे डॉक्टर तुम्हाला रक्ताचे नमुने घ्यायच्या १२ तास आधी काहीही खायला सांगणार नाही.
- उच्च पातळीच्या ट्रायग्लिसरायड्स साठी उपचार हे परिस्थितीवर कंट्रोल करणारे असतात.
- शरीरातील हार्मोन्स चा बॅलन्स ठेवण्यासाठी आणि मूत्रपिंडाचे किंवा जठराचे आजार वरील उपचारासाठी तुम्हाला शरीराचे वजन नियमित ठेवणे आवश्यक आहे .
- तुमचे डॉक्टर तुम्हाला काही औषधे जसे स्टॅटिन्स, नियासिन किंवा ओमेगा फॅटी ॲसिडस् सप्लिमेंट्स देऊ शकतात.
स्वतःची घ्यायची काळजी:
- मद्यपान आणि धूम्रपान टाळावे.
- निरोगी/सकस आहार घ्यावा.
- नियमित चालायला जा आणि योग्य व्यायाम करा.