हार्मोनल असंतुलन काय आहे?
मानवी शरीरात हार्मोनच्या सामान्य पातळीमध्ये व्यत्यय हार्मोनल असंतुलन म्हणून ओळखला जाते. हार्मोन्स हे आपल्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीद्वारे स्त्रावित केलेली रसायने आहेत. ते रक्तप्रवाहातून प्रवास करतात आणि अवयवांना संदेश वितरीत करतात, त्याद्वारे त्यांचे कार्य नियंत्रित ठेवता येते आणि त्यात समन्वय साधता येतो. गर्भधारणेसारख्या विशिष्ट टप्प्यांत हार्मोनमध्ये चढ-उतार नैसर्गिकरित्या होते किंवा वय वाढण्यासोबत हे बदल होत असतात. असंतुलन हे लिंग आणि पर्यावरणाच्या घटकांनुसार सुद्धा बदलत असते. हार्मोनल बदलांकडे लक्ष न दिल्याने शारीरिक आणि मानसिक विकृती उद्भवू शकतात.
त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
हार्मोनल असंतुलनचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे अंतर्गत कारणांवर अवलंबून असतात आणि ती पुढील प्रमाणे आहेत:
- थकवा.
- कमी जास्त प्रमाणात घाम येणे.
- चिंते ची भावना.
- चिचिडपणा.
- वंधत्व.
- निपल डिस्चार्ज.
- वजनात वेगवान वाढ.
- प्रौढांना मुरुम येणे.
- वजन कमी होणे.
- अनियमित मासिक पाळीचे चक्र.
- स्मृती लोप पावणे.
- कमकुवत स्नायू आणि हाडे.
- केस गडणे.
- इनसोमनिया (झोप येण्यास त्रास होणे).
- गरम वाफा.
- उदासीनता.
- थंड हात आणि पाय.
- मन बदलणे.
- बदललेल्या आतड्यांच्या हालचाली.
हार्मोनल असंतुलनसह हृदय दर, रक्तदाब आणि ब्लड शुगर पातळीतील बदल देखील दिसू शकतात.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
हार्मोनल असंतुलनची मुख्य कारणं आहेत :
- ताण.
- क्रोनिक फॅटीग सिंड्रोम.
- अनुवांशिक बदल.
- स्टेरॉईड्ससारखी काही औषधे.
- रजोनिवृत्ती (मेनोपॉज).
- गर्भधारणा.
- गर्भनिरोधक गोळ्या.
- स्वयं प्रतिकार परिस्थिती (ऑटोमिम्यून परिस्थिती).
- अयोग्य आहार.
- थायरॉईड ग्रंथीची समस्या - हायपर किंवा हायपो थायरॉईडीझम.
- वय वाढणे.
- काही ॲलर्जी.
- वैद्यकीय परिस्थिती जसे की पॉलिसीस्टिक ओवेरीयन डिसीज, प्रोलॅक्टिनोमा, कोणत्याही ग्रंथी (पिट्यूटरी, थायरॉईड, अंडाशय, अंडकोष, ॲड्रेनल, हायपोथालेमस आणि पॅराथ्रॉइड) जास्त किंवा कमी कार्य करणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
तपशीलवार इतिहास घेणे आणि शारीरिक तपासणी व्यतिरिक्त, हार्मोनच्या पातळीच्या असंतुलनाचे मूल्यांकन लस आणि सीरम चाचण्यांच्या परिणामांद्वारे केले जाते. टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजेनसारख्या सेक्स हार्मोनच्या पातळी ओळखण्यासाठी चाचणी केली जाऊ शकते. अल्ट्रासाऊंड किंवा एमआरआय (MRI) सारख्या इमेजिंग अभ्यासांची आवश्यकता असू शकते.
हार्मोनल असंतुलन हे अंतर्निहित कारणांच्या उपचारानुसार व्यवस्थापित केले जाते आणि आणि सामान्यपणे खालील पद्धतींनी उपचार केले जाते:
- गोळ्या, क्रीम आणि पॅचच्या स्वरूपात सिंथेटिक हार्मोन.
- हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी.
- सक्रिय जीवनशैली आणि निरोगी आहाराद्वारे हॉर्मोनल असंतुलनाची लक्षणे सुधारण्यासाठी मदत करण्याचा सल्ला दिला जातो.
- चिंता आणि नैराश्य असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी अँटी-ॲनझायटी औषधे आणि अँटीडप्रेसन्ट.
- हार्मोन्सचा अतिरिक्त स्राव झाल्यास हार्मोन विरोधी औषधे.