कीटकाचा चावा आणि दंश काय आहे?
कीटकाचा चावा आणि दंश एक अत्यंत सामान्य बाब आहे आणि घरात किंवा घराबाहेर कुठेही घडू शकते. बऱ्याच बाबतीत, चावणे आणि डंक यांचा परिणाम काही तास किंवा दिवसात कमी होतो आणि परिस्थिती गंभीर होत नाही. मात्र, काही प्रकरणांमध्ये, तुम्हाला गंभीर परिणाम किंवा मलेरिया किंवा लाइम रोगासारखे आजारपण देखील होऊ शकतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
प्रत्येक कीटकाच्या चाव्याव्दारे किंवा डंकामुळे उद्भवणारे चिन्ह वेगवेगेळी असतात. पण बहुतेक कीटकांचे चावे आणि दंश यामुळे दिसणारे काही सामान्य लक्षणं आहेत. त्वचेवर लाल रंगाची एक छोटी गाठ किंवा टेंगुळ दिसून येतो. कीटकांनी चावा किंवा डंक केलेल्या जागेवर दाह, खाज किंवा अगदी वेदना होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये, ती जागा खूप गरम होऊ शकते किंवा अगदी बधिर देखील होऊ शकते. एखाद्या साध्या चाव्याची काळजी घरीच घेतली जाऊ शकते. सर्वात स्पष्ट चिन्हे काही तासांमध्ये सुस्पष्ट होऊ शकतात आणि सर्व चिन्ह एका दिवस किंवा त्यापेक्षा आधीच नाहीसे होतात. काही अत्यंत संवेदनशील कीटकाचे चावे किंवा डंक यांना ॲनाफिलेक्टिक शॉक म्हणून ओळखले जाते. यात घसा दाबला गेल्यासारखा वाटतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सर्वात सामान्य कीटकांमध्ये कुंभारीण माशी, गोचीड, पिसू, ढेकूण, डास, मधमाश्या आणि गांधीलमाशी यांचा समावेश होतो. जेव्हा या कीटकांपैकी एखादा चावतो तेव्हा विष शरीरात सोडले जाते. शरीर प्रतिसाद म्हणून एखादे लक्षणं दर्शवते. जेव्हा विषात संसर्गाला कारणीभूत असलेले जंतू असतात, तेव्हा त्या व्यक्तीला रोग होण्याची शक्यता असते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
एखाद्या डॉक्टराला कीटकाच्या चाव्याचे निदान करणे किंवा परीक्षण करणे फारच सोपे आहे, जर ती व्यक्ती चावा घेणाऱ्या कीटकांला ओळखण्यास सक्षम असेल तर ते फारच उपयुक्त ठरू शकते.
बहुतेक कीटकांचा चावा आणि दंश केवळ साधारण घरगुती काळजी घेऊन बरे होतात. चावा घेतलेली जागा स्वच्छ धुवून दाह आणि खाज कमी करण्यासाठी बर्फ चोळावा. अगदी शांत करणारे क्रीम वापरणे, देखील त्वरीत आराम देऊ शकेल. सतत खाज येत असल्यास, बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट लावता येऊ शकते.
जर व्यक्तीचे लक्षणे आणि स्थिती गंभीर असेल तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. यात कपडे सैल करणे, पीडिताला एका कुशीवर वळवणे किंवा अगदी सीपीआर देणे देखील समाविष्ट आहे. मधमाशीनी दंश केल्यास विष पसरणे टाळण्यासाठी काटा काढून घेणे महत्वाचे आहे.
अँटी-हिस्टामाइन आणि पेनकिलर वेदना, सूज आणि खाज कमी करण्यास मदत करतात.