प्रसव आणि डिलिव्हरी दुविधा काय आहेत?
गर्भधारणा आणि बाळंतपण स्त्रीच्या आयुष्यातील विलक्षण अनुभव असतो. पण, काही आरोग्य समस्या हा अनुभव खराब करु शकतात, जसे प्रसव कळांची सामान्यपणे प्रगती न होणे, कमकुवत संकोचन किंवा गर्भाशयाचा कमी विस्तार. सर्व प्रसूती आणि डिलिव्हरीच्या कॉम्प्लीकेशन्सला “ऑबस्टेट्रिक कॉम्प्लीकेशन्स” हा एकच सर्वव्यापी शब्द वापरला जातो. आणि याचा आई आणि मुलाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
गर्भाशयातील पाण्याची पिशवी वेळे आधी फुटणे ही गंभीर बाब आहे, जर उपचार नाही केले तर संसर्ग होऊ शकतो. याच्याशी निगडीत इतर समस्या या आहेत - आईमध्ये पोषक आहाराची कमतरता, किरकोळ शारीरिक असामान्यता आणि जन्माच्या वेळची कॉम्प्लीकेशन्स. या कॉम्प्लीकेशन्समुळे मुलावर दीर्घकालीन प्रभाव होऊ शकतो आणि आणि भविष्यात वर्तनासंबंधी समस्या होऊ शकतात. त्याचप्रमाणे, जेव्हा पहिल्या डिलिव्हरीसाठी 20 तास आणि नंतरच्या डिलिव्हरीसाठी 14 तास पार होतात, तेव्हा याला प्रसूतीची खराब प्रगती मानले जाते. म्हणूनच बाळावर आणि आईवर कोणतेही हानिकारक प्रभाव टाळण्यासाठी, या जटिलतेची संबंधित लक्षणे समजून घेणे आवश्यक आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
प्रसूतीच्या प्रगतीच्या प्रकारानुसार कॉम्प्लीकेशन्स वेगवेगळी असतात. ती पुढील प्रमाणे आहेत:
- पेरीनेल टीअर.
- बाळाच्या हृदयाची गती असाधारण होणे.
- गर्भनाळे संबधीत समस्या.
- गर्भाशयातील पाणी निघण्याची समस्या.
- बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी होणे.
- डिलीव्हरीच्या वेळी बाळाचा खांदा अडकणे.
- योनितून जास्त रक्तस्त्राव होणे.
- रक्तानी भरलेला म्युकस बाहेर पडणे.
- गर्भपात होऊ शकेल अशी जटिलता.
- एक्लेम्प्शिया - गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडात प्रोटिन्सची उपस्थिती; ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे.
- रप्चर्ड गर्भाशय.
- एक्टोपिक गर्भधारणा (गर्भाशयाच्या बाहेर रोपण, विशेषतः फॅलोपीयन नलिकेमध्ये).
- त्वचेचा रंग खराब होणे.
- गर्भधारणेमध्ये ब्रीच (बाळाची स्थिती उलटी होणे).
- फायब्रोइड्स.
- मोठ्या आकाराचे बाळ आणि डोके.
- योनिच्या भिंतींपासून प्लेसेंटा वेगळे होण्यास समस्या.
याची मुख्य कारणे काय आहेत?
कॉम्प्लीकेशन्सच्या मुख्य कारणांमध्ये याचा समावेश असू शकतो:
- आईमध्ये पौष्टिकतेची कमतरता.
- मद्यपान किंवा असुरक्षित पदार्थाचे सेवन.
- किरकोळ शारीरिक समस्या.
- जन्माच्या वेळची कॉम्प्लीकेशन्स.
- पूर्वी केलेले सी-सेक्शन.
- गर्भधारणेमुळे वाढलेला उच्च रक्तदाब.
या शिवाय पुढील काही इतर कारणे देखील जवाबदार असू शकतात:
- गर्भनाळे संबंधित समस्या: काही प्रकरणांमध्ये, नाळ बाळाच्या हातामधे किंवा पायामधे अडकू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये, गर्भनाळ बाळाच्या गळ्याला गुंडाळली जाऊ शकते. हे टाळण्यासाठी, सिझेरिन करून मृत्यू टाळला जाऊ शकतो.
- अनियमित हृदयाचे ठोके.
- प्रसव वेदना सुरू होण्याआधी पाणी फुटणे.
- गर्भाशयाचे तोंड उघडताना किंवा कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या असमर्थतेमुळे योनीतुन अतिशय रक्तस्त्राव होणे. याचा परिणाम, कदाचित आईचा मुत्यू पण होऊ शकतो.
- गर्भधारणा 42 आठवड्यापेक्षा जास्त राहिली तरी समस्या निर्माण होऊ शकते.
- जर आईचे वय 30 पेक्षा जास्त असेल.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
फिटल डिस्ट्रेस (गर्भ संकट) ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये हृदयाच्या ठोक्याच्या गतीत आणि ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो. फेटस्कोप आणि कार्डियोटोकोग्राफीच्या मदतीने याचे निदान केले जाते. वरील परिस्थितीचा उपचार आईच्या समस्येच्या प्रकारानुसार बदलू शकतो आणि यात समावेश आहे:
- गंभीर प्रकरणांमध्ये, संपूर्ण विश्रांती किंवा देखरेखेखाली विश्रांती.
- रक्त चढवणे.
- तात्कालिन सीझरिन डिलिव्हरी.
- योनिद्वारे डिलीव्हरीमध्ये मदत करण्यासाठी फोर्सेप किंवा त्यासमान उपकरणाचा वापर.