सारांश
आम्हा प्रत्येकाला विचार, व्यवहार व भावनांवर प्रभाव पडण्याचे अनुभव होतातच. हे एखादी घटना किंवा व्यक्तीला प्रतिसाद म्हणून किंवा आम्ही अपेक्षा किंवा पूर्वानुमान न केलेल्या घटनांचे परिणाम म्हणून समोर येतात. टोकाच्या व अत्यधिक प्रमाणामध्ये आढळल्यास, या अवस्था किंवा लक्षणे काही पूर्वनिकषित निकषांच्या आधारे, मानसिक आजार मानले जातात. मानसिक आजारांची कारणे विविध असू शकतात उदा. धक्कादायक घटना, उपेक्षा, एखाद्या अपघातामुळे झालेले दिव्यांगत्त्व, प्रिय व्यक्तीचे निधन, जनुकीय घडण विस्कळीत पडणें, मेंदूतील दोष किंवा त्याला इजा, विकासात्मक प्रभाव इ. मानसिक आजारावरील उपचार अंतर्निहित कारणावर अवलंबून असते आणि त्याच्यामध्ये समुपदेशन, मानसिक उपचार, संमोहन उपचार, औषधोपचार, इलेक्ट्रोकंवल्झिव्ह थेरपी आणि शस्त्रक्रिया सामील असतात. प्राप्त मानसिक आजाराचे निवारण जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोण ठेवणें, ध्यानधारणा, जीवनातील विविध घटना व तणांवात हातळण्याचे शिक्षण मुलांना देणें, निरोगी आहार, शारीरिक गतिविधी आणि काम व जीवन संतुलित करणारे छंद जोपासणें यांद्वारे शक्य आहे.