मुडदूस - Rickets in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

April 26, 2019

July 31, 2020

मुडदूस
मुडदूस

मुडदूस म्हणजे काय?

मुडदूस हा एक आजार आहे जो व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम कमतरतेमुळे होतो. याचा हाडांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो, तसेच बालक व प्रौढांच्या वाढीवर व विकासावर परिणाम होतो ज्यामध्ये प्रौढत्व शिथिल होते ज्यामुळे हाडं नाजूक, अशक्त आणि वेदनादायक आणि विकृत होतात. बालकांमध्ये दिसणाऱ्या या स्थितीला मुडदूस व प्रौढांमधल्या स्थितीला ऑस्टिओमॅलेसिया असे म्हणतात.

याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?

सुरुवातीला दिसणारी लक्षणे व चिन्हे यामध्ये हाडांचे दुखणे, हाडांच्या सांगड्याची विकृती, दातांचा त्रास, हातामध्ये चुकीची वाढ, गुडघा व कॉस्टोकाँड्रल जोडणीमध्ये (ब्रेस्टबोनशी जोडलेले रिब्स), ज्या लवकर होणाऱ्या हाडांच्या वाढीसाठी च्या जागा आहेत व नाजूक हाडे आहेत. बाळाचा टाळू भरण्यात उशीर होणे (बाळाच्या डोक्यावरचे मऊ ठिकाण) आणि कवटीच्या हाडामधील दबाव छोट्या मुलांमध्ये दिसून येतो. तेथे कायफोसिस किंवा स्कॉलिओसिस (पाठीचा कणा पुढच्या बाजूस किंवा एका बाजूला झुकणे) मोठ्या मुलांमध्ये दिसतो. सांगाड्यामधील न दिसणारी लक्षणांमध्ये दुखणे, अस्वस्थता, कार्यामध्ये उशीर व खराब वाढ. मुडदूस ला समान वैद्यकीय गुणधर्मामुळे सांगाड्याचा डीस्प्लेसियास समजले जाते.

याची मुख्य कारणे काय आहेत?

मुडदूस च्या मुख्य कारणांमध्ये व्हिटॅमिन डी व कॅल्शिअम ची कमतरता दिसते. या कमतरतेसाठी सामान्यपणे खालील कारणे दिसतात:

  • कुपोषण.
  • व्हिटॅमिन डी चे चुकीचे शोषण.
  • त्वचेचे सूर्यप्रकाशामध्ये जास्त प्रमाणात उघड न होणे.
  • गरदोरपणा.
  • वेळेआधी झालेल्या गोष्टी.
  • स्थूलपणा.
  • किडनी व यकृताचे आजार.
  • काही अँटी कॉनव्ह्यूलेसन्ट्स (आळसत्वासाठी), अँटीरेट्रोव्हायरल (एचआयव्ही साठी).

मिनरलायझेशन च्या अडचणी कॅल्शिअम व फॉस्फेट च्या कमतरतेनुसार कॅल्शिपेनिक व फॉस्फोपेनिक मध्ये वर्गीकृत केलं जातं. मिनरलायझेशनचे दोष एकतर विरक्त किंवा सेकंडरी व्हिटॅमिन डी च्या कमतरतेसाठी, ज्यामुळे ऑस्टरॉइड चे एकत्रीकरण होते (मिनेरलाईज न झालेले घटक) हाडाच्या टिश्यू मधील वाढीच्या प्लेट खाली असते. यामुळे काही काळानंतर हाडे कमकुवत होतात व वाकली जातात.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी च्या पातळ्या, अल्कलाईन फोस्पटस, फॉस्फरस, आणि पॅराथायरॉईड हार्मोन्स च्या पातळ्या ह्या सर्वांच्या लॅबोरेटरी मधील तपासण्या करून व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे निदान केले जाते. जिथे हाडांचे बदल दिसतात, तिथे एक्स-रे चा सल्ला दिला जातो. हाडाच्या बायोप्सी करावी लागू शकते जी ऑस्टिओमलासिया व मुडदूस चे निदान करण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे.

कमतरतेची तीव्रता व गुणधर्म यावर व्हिटॅमिन डी किती प्रमाणात द्यावे हे ठरवले जाते. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम देण्यास सुरुवात केली जाते व एक्स-रे होईपर्यंत कायम ठेवले जाते.

इतर उपाय:

बऱ्याच सोप्या उपाय योजनांमुळे तुम्ही मुडदूस थांबवू शकता. त्यासाठी तुम्ही:

  • दुग्धजन्य पदार्थ व अंडी असणारा आहार घेणे आवश्यक आहे.
  • बाहेर मुख्यतः सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये वेळ घालवा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी ची औषधे घ्या.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Rickets and osteomalacia.
  2. Manisha Sahay, Rakesh Sahay. Rickets–vitamin D deficiency and dependency. Indian J Endocrinol Metab. 2012 Mar-Apr; 16(2): 164–176. PMID: 22470851
  3. Behzat Özkan. Nutritional Rickets . J Clin Res Pediatr Endocrinol. 2010 Dec; 2(4): 137–143. PMID: 21274312
  4. National Center for Advancing and Translational Sciences. Rickets. Genetic and Rare Diseases Information Center
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Rickets
  6. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; NCI Dictionary of Cancer Terms
  7. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Rickets

मुडदूस साठी औषधे

Medicines listed below are available for मुडदूस. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.