ओपॉईड विषारीपणा काय आहे?
ओपॉईड विषारीपणा ही अशी परिस्थिती आहे जिथे स्वतःहून किंवा अनावधानाने जास्त ओपॉईडची मात्रा घेतल्याचे लक्षण दिसून येतात. ओपॉईड हे औषधाचा प्रकार आहे जे वेदना कमी करण्यासाठी घेतले जाते. जास्त काळासाठी घेतले असता याच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती किंवा सहनशक्ती निर्माण होते. प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामूळे, तुम्हाला औषधाचा परिणाम मिळवण्यासाठी जास्त मात्रेची गरज पडू शकते. औषधाची जास्त मात्रा विविध अवयवांवर परिणाम करू शकते आणि वेळेत उपचार न झाल्यास मृत्यू येऊ शकतो.
आशिया मध्ये ओपॉईड च्या गैरवापराचा प्रघात 0.35 % आहे.
याचे मूख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जर तूम्ही खाली दिलेले लक्षणे अनुभवत असाल, तर तुम्ही ओपॉईड ची जास्त मात्रा घेत आहात:
- पिनपॉईंट प्यूपील/डोळ्यांची बाहूली (आकुंचित प्यूपील).
- शुद्ध हरपणे.
- श्वास घ्यायला त्रास होणे.
- रक्त दाब कमी होणे.
- हृदयाचा वेग कमी होणे.
- त्वचा कोरडी पडणे.
- शरीराचे तापमान कमी होणे.
- मूत्र विसर्जन पूर्ण न होणे.
- जुलाब किंवा बद्धकोष्ठता.
ओपॉईड मेंदूच्या त्या भागावर परिणाम करतो जो भाग श्वासोच्छवास चे नियंत्रण ठेवतो, त्यामूळे जास्त मात्रा श्वसनाचे नैराश्य किंवा मृत्यू ला कारणीभूत ठरू शकते.
याचे मुख्य कारणे काय आहेत?
याचे मुख्य कारण हे ओपॉईड ची जास्त मात्रा घेणे हेच आहे. ओपॉईडची विषबाधा होण्याचा धोका तुम्हाला होऊ शकतो जर तुम्ही:
- ओपॉईड दिलेल्या मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात घेत असाल.
- इतर ड्रगज किंवा दारू बरोबर मिसळून घेत असाल.
- शरीरात ओपॉईड ड्रग इन्जेक्ट करत असाल.
- प्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर (ओपॉईड बंद केल्याच्या दिवसानंतर होते).
- एचआयव्ही संसर्ग ,नैराश्य, मूत्रपिंड किंवा यकृत काम न करणे.
- 65 वर्ष वय किंवा त्याहून जास्त असेल तर.
याचे निदान आणि उपचार काय आहे?
तुमचे डॉक्टर ओपॉईड च्या विषबाधेचे निदान तुमचे महत्वाचे अवयव जसे श्वसनाचा वेग, हृदयाचा वेग आणि रक्तदाब आणि आकुंचित प्यूपील साठी डोळ्याचे निरीक्षण याची तपासणी करतील. ओपॉईड ची रक्तातील पातळी जाणून घेण्यासाठी प्रयोगशाळेत चाचणी केली जाईल आणि इतर अवयवांच्या आरोग्याची पाहणी केली जाईल.
पहिला आणि महत्वाचा, उपचार म्हणजे डॉक्टरांकडून श्वास नलिकेत काही अडथळा नाही आहे ना हे बघण्यासाठी ऑक्सिजन दिला जाऊ शकतो. यानंतर, ओपॉईड विषबाधेसाठी अँटिटोड इंजेकशन मार्गे किंवा नाकावाटे दिल्या जाऊ शकते. अँटिटोड लवकरात लवकर दिले तर विषबाधेचा परिणाम लगेचच जास्त वेगात उलटा होऊ शकतो आणि मृत्यू होण्यापासून वाचू शकतो.अँटिटोड ची मात्रा तुमच्या शरीरात ओपॉईड किती प्रमाणात आहेत यावर अवलंबून असतो.