फॉस्फरसची कमतरता म्हणजे काय?
फॉस्फरस मानवी शरीरात दुसरा सर्वात विपुल घटक आहे आणि विविध कार्ये करतो. आपल्या आहारातील सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे आरोग्यस समस्या येऊ शकतात.
हा आपल्या शरीरातील काही अणू घटकांचा भाग आहे, जसे की आपले डीएनए, आणि आपल्या शरीरात बनलेल्या अणूं उर्जामध्ये देखील समाविष्ट असतो. शरीरामध्ये फॉस्फरस हाडांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असतो. उर्वरित सौम्य ऊतकामध्ये वितरीत केला जातो. पेशींच्या वाढीसाठी आणि ऊर्जा प्राप्त करण्यासाठी अन्नाचे विघटन करायला शरीरास फॉस्फोरसची आवश्यकता असते. हाडांच्या आरोग्यासाठी पण फॉस्फरस आवश्यक आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
फॉस्फरसच्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- हाडांचा अपुरा विकास.
- चालताना अडचण.
- अशक्तपणा.
- ॲनिमिया.
- लवकर वजन कमी होणे.
- तोंडाचे संसर्ग.
- सांधे दुखी.
- कमी प्रमाणात भूक लागणे.
नवजात आणि वाढत्या मुलांमध्ये फॉस्फरसची कमतरता हानिकारक प्रभाव पाडू शकते आणि हाडांची विकृती आणि तीव्र आजार होऊ शकतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
फॉस्फरसची कमतरतेचे मुख्य कारण अपुरा आहार आहे, ज्यात फक्त अल्प पोषण असलेले जंक फूड समाविष्ट असते. फॉस्फरस अनेक नैसर्गिक खाद्य पदार्थांमध्ये असतो आणि म्हणूनच फॉस्फरसची कमतरता फारशी सामान्य नाही आहे.
नियमितपणे काही औषधोपचार घेतल्याने त्याचे शोषण होऊ शकते. या औषधांमध्ये अँटासिड समाविष्ट असतात.
शिवाय, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीरातील फॉस्फरसचे कमी शोषण होऊ शकते ज्यामुळे फॉस्फरसची कमतरता होऊ शकते. प्रौढांसाठी (आरडीआयनुसार) दररोज 1000 एमजी/दिवस फॉस्फरस निर्धारित केले जाते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
रक्त तपासणी आणि चिन्हे आणि लक्षणे बघून डॉक्टर फॉस्फरसची कमतरता शोधून शकतात.
फॉस्फरसची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टर आहार बदलण्यास सल्ला देतात. विशेषतः असे खाद्य पदार्थ ज्यात जास्त प्रमाणात फॉस्फरस असते,जसे की
- नट्स.
- बीन्स.
- कडधान्य.
- चीज.
- दूध.
- भाज्या.
- भोपळ्याच्या बिया.
- मासे.
हळूहळू आहार बदलून फॉस्फरसच्या कमतरतेचे व्यवस्थापन करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण, डॉक्टर मल्टीव्हिटॅमिन सप्लीमेंट्सची शिफारस देखील करू शकतात.