शिगेलॉसिस काय आहे?
शिगेलॉसिस हा शिगेला नावाच्या बॅक्टेरियाच्या समूहामुळे होणारा आक्रमक, संसर्गजन्य आजार आहे. याचे सर्वात सामान्य वैशिष्ट्य अतिसार आहे. शिवाय रुग्णात ताप आणि पोटात कळा ही लक्षणे पण पाहिली जातात. स्वच्छतेचा अभाव आणि कमतरता असलेल्या भागातील लहान मुलांमध्ये याची बाधा वारंवार होते.कारण हा रोग मल आणि मौखिक मार्गाने पसरतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यानंतर 1 किंवा 2 दिवसांनी याची लक्षणे दिसून येतात.
सामान्यपणे पाहिले जाणारे चिन्ह खालील प्रमाणे आहेत:
- म्युकस, रक्त आणि पस असलेला अतिसार, म्हणजे डिसेंट्री.
- ताप.
- पोटात कळा.
- पोट साफ न झाल्यासारखे वाटणे.
- थकवा.
- मळमळ.
- उलटी.
याची दुर्मिळ लक्षणे अशी आहेत:
- संसर्गानंतरचा संधिवात: डोळ्यात जळजळ, सांधेदुखी आणि लघवी करताना वेदना.
- रक्त मार्गातील संसर्ग: हे एचआयव्ही, कुपोषण आणि कर्करोगामुळे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झालेल्यांमध्ये दिसून येतात.
- दौरे.
- हिमोलाटिक- युरेमिक सिंड्रोम.
याची मुख्य कारणं काय आहेत?
शिगेला बॅक्टेरियाच्या अपघाती सेवनाने शिगेलॉसिसची बाधा होते.
याच्या काही कारणांमध्ये हे समाविष्ट आहेत:
- शिगेला बॅक्टेरियाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने.
- संसर्गित अन्नाच्या सेवनाने.
- संक्रमित पाणी पिल्याने.
- चाइल्डकेअर सेंटर, कारागृह आणि नर्सिंग होममध्ये किंवा अस्वच्छ आणि आरोग्यासाठी हानिकारक भागात राहणाऱ्या लोकांना शिगेलॉसिस चा जास्त धोका असतो.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
शिगेलॉसिस च्या निदानासाठी वैद्यकीय इतिहास आणि परीक्षण उपयोगी ठरते. शिगेला बॅक्टेरिया आणि टॉक्सिन तपासायला डॉक्टर मल चाचणी सुचवू शकतात.
नियंत्रणासाठी पुढील उपाय केले जाऊ शकतात:
- शिगेलॉसिस 5 ते 7 दिवसात आपोआप बरा होतो.
- सौम्य शिगेलॉसिस साठी भरपूर प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करावे.
- शरीरातून होणाऱ्या द्रवाची भरपाई करायला भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
- सॉल्ट्स आणि पाण्याचे नुकसान भरुन काढायला लिंबूपाणी, ताक, घरगुती ओआरएस, नारळाचे पाणी यासारखे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन प्यावे.
- जलद परिणामांसाठी इंट्राव्हेनस द्रव दिले जातात.
- शिगेलॉसिस च्या फक्त गंभीर प्रकरणांमध्ये अँटी बायोटिक्स देऊन उपचार केले जातात. अभर्क, वयोवृद्ध, कमकुवत रोग प्रतिकारशक्ती असलेले व्यक्ती आणि एचआयव्हीने ग्रासीत व्यक्तींना पण अँटी बायोटिक्स दिले जातात.