रांजणवाडी काय आहे?
रांजणवाडीला हॉर्डिओलम देखील म्हणतात, हे एक संक्रमण आहे जे पापण्यांना प्रभावित करतो. हे पापण्यांच्या बाह्य किंवा आतल्या पृष्ठभागावर असू शकते आणि पापण्यांच्या ग्रंथींना प्रभावित करते. रांजणवाडी, पापणीवर लहान मुरुमासारखी किंवा फोडासारखी दिसते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- रांजणवाडी, सामान्यतः डोळ्याजवळ एका मुरुमासारखी दिसते.
- ही लहान आणि लाल रंगाची असते. यामध्ये पस असल्यामुळे मध्यभागी पिवळी असतात.
- रांजणवाडीमुळे डोळ्याजवळ वेदना होतात, ज्या डोळे उघडताना आणि बंद करताना वाढतात.
- यामुळे पापण्या सुजल्यासारख्या दिसतात आणि यामधून पस बाहेर निघू शकतो.
- डोळ्याच्या हालचालीत अस्वस्थता वाटते, डोळ्यातून वारंवार पाणी येते आणि सतत डोळ्यात काहीतरी असल्यासारखे वाटते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
- रांजणवाडी जीवाणूंच्या संसर्गामुळे होऊ शकते.
- जोखमीच्या घटकांमध्ये प्रतिकार शक्ती वर परिणाम करणारी परिस्थिती आणि पोषण तत्व कमी असलेला आहार याचा समावेश असतो.
- हा एक संसर्ग असल्याने, एकमेकांचा नॅपकिन किंवा इतर वस्तू वापरल्यामुळे पसरू शकतो.
- वैयक्तिक स्वच्छता न राखणे हे आणखी एक कारण आहे, जे रांजणवाडीची जोखीम वाढवते.
- कधीकधी, डोळ्यांचा कोरडेपणा यामुळे देखील होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- रांजणवाडीचे निदान खूप सोपे आहे आणि कोणत्याही तपासणीची आवश्यकता नसते.
- फक्त प्रकाशामध्ये पाहून डॉक्टर याचे निदान करू शकतात.
- रांजणवाडी थोड्या दिवसात आपोआपच बरी होते.
- जर ती बरी नाही झाली किंवा सतत वेदना होत असेल, तर डॉक्टर उपचारांचा सल्ला देतात.
- आवश्यक असल्यास, संक्रमण बरे करण्यासाठी आणि बॅक्टेरियाचा नाश करण्यासाठी अँटीबायोटिक्स दिले जातात.
- रांजणवाडीने प्रभावित भागात पस साचल्यामुळे खूप दबाव पडत असेल, तर काप मारुन पस काढला जातो.
- वैयक्तिक स्वच्छता राखणे, टॉवेल शेअर न करणे आणि प्रभावित भागाला सारखा हात लावणे टाळणे हे सल्ले दिले जातात.