दातांवरचे किटण - Dental Plaque in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

May 02, 2019

March 06, 2020

दातांवरचे किटण
दातांवरचे किटण

दातांवरचे किटण काय आहे?

दातांवरचे किटण हा दात आणि आसपासच्या भागात जमा होणारा मऊ आणि चिकट पदार्थाचा संग्रह असतो. हे दात किडणे आणि हिरड्यांचे रोगांचे सर्वात सामान्य कारण आहे. हा पदार्थ पांढऱ्या रंगाचा असल्यामुळे, प्रथम दर्शनी दिसणे कठीण असते. मात्र, एकदा सुरुवात झाली की दातांना डाग पडतात आणि ते पिवळसर व्हायला सुरवात होते, तेव्हा हे किटण स्पष्टपणे दिसू लागते आणि तुमच्या हास्याचे स्वरूप बिघडवते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

दातांवरचे किटण एक चिकट पांढरा पदार्थ असतो जो सहजपणे दिसत नाही. पण जर एखाद्याने अलीकडे दात घासलेच नसले तर उघड्या डोळ्यांनी तो दिसू शकतो. रोज सकाळी दात नीट घासत  नसल्यास काही काळानंतर ते स्पष्टपणे दिसू शकते. हिरड्यांलगत दात घासण्यास पांढऱ्या पेस्टसारखे साहित्य निघते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

तोंडात शर्करा / सुक्रोज / कार्बोहायड्रेट्सचे विभाजन झाल्यानंतर बॅक्टेरियामुळे किटण तयार होते आणि ते दातावर जमतात आणि दात चिकट होण्यास सुरुवात होते.

जेव्हा कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपदार्थ तोंडातून योग्य प्रकारे साफ केले जात नाही तेव्हा ते तयार होतात. तोंडातील उर्वरित शर्करा बॅक्टेरियाच्या वाढीला प्रोत्साहित करतात. कार्बोहायड्रेट्सचे ब्रेकडाउन झाल्यावर ॲसिड बाय प्रॉडक्ट्स बनतात, ज्यामुळे दातावरील एनॅमलचे/ आवरणाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

घरामध्ये दातांवरचे किटण सहजपणे दिसू शकते. म्हणूनच त्याचे निदान अत्यंत सोपे आहे. किटणाचे डाग कुठे आहेत आणि ते कुठे जमा झाले आहे शोधून काढण्यासाठी घरामध्ये एक सोपी चाचणी केली जाऊ शकते. हे करण्यासाठी, बऱ्याच किरकोळ दुकानात आणि फार्मेसिसमध्ये उपस्थित असलेल्या लाल सुट्ट्या  गोळ्या खरेदी करू शकता. यापैकी एक गोळी चावून खाल्यास किटणाचे डाग सुस्पष्ट होऊन उघड्या डोळ्यांना दिसतात.

दंतचिकित्सक देखील किटणाचे निदान करण्यासाठी या चाचणीचा वापर करु शकतात.

दातांवरचे किटण सहजपणे घरच्याघरी काढून टाकले जाऊ शकतात. आधी दातांवर फ्लॉसिंग करून आणि नंतर व्यवस्थित ब्रश करून यापूसन मुक्तता मिळवता येते. जेव्हा दातांवरचे किटण कमी होते तेव्हा साधे ब्रशिंग देखील त्यातून मुक्त होण्यास मदत करते.

प्रतिबंधकमध्ये खालील उपायांचा समावेश आहेः

  • दिवसातून दोनदा दात स्वच्छ करा.
  • फ्लोराइड-बेस्ड टूथपेस्ट वापरवी.
  • अँटी-बॅक्टेरियल माऊथवॉश वापरवा.
  • दातात अडकलेले अन्न कण काढण्यासाठी फ्लॉसचा वापर करावा.
  • नियमित दंत तपासणी करावी.
  • आहारामध्ये साखरेचे प्रमाण कमी करावे.


 



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Dental plaque identification at home.
  2. National Institutes of Health; National Institute of Dental and Craniofacial Research. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; PLAQUE: What it is and how to get rid of it?.
  3. Seneviratne CJ et al. Dental plaque biofilm in oral health and disease. Chin J Dent Res. 2011;14(2):87-94. PMID: 22319749
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Oral Health Conditions.
  5. Philip D Marsh. Dental plaque as a biofilm and a microbial community – implications for health and disease. BMC Oral Health. 2006; 6(Suppl 1): S14. PMID: 16934115

दातांवरचे किटण साठी औषधे

Medicines listed below are available for दातांवरचे किटण. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.