व्हॅजिनायटिस काय आहे?
व्हॅजिनायटिस ही दुखावा, खाज आणि स्त्रावा (ज्याला कधीकधी दुर्गंधी येते) सह योनीला आलेली सूज आहे. व्हॅजिनायटिसचे सर्वात सामान्य कारण संसर्ग आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
व्हॅजिनायटिसची लक्षणे संसर्गाच्या प्रकारानुसार बदलू शकतात ज्यात खालील समाविष्ट आहे:
बॅक्टेरियल व्हॅजिनायटिसमध्ये कोणतीही लक्षणं नसू शकतात किंवा खालील लक्षणं दिसू शकतात:
- पातळ पांढरा किंवा करडा रंगाचा योनी स्राव.
- तीव्र माश्यांसारखी दुर्गंधी (सामान्यतः संभोगानंतर).
बुरशीजन्य संसर्ग खालील लक्षणांसह दिसून येतो:
- कॉटेज चीज सारखा दिसणारा घट्ट, पांढरा स्राव.
- पाण्यासारखा, वास नसलेला.
- खाज आणि लाली.
ट्रायकोमोनिआसिस संसर्गास कोणतीही लक्षणे दिसत नाहीत किंवा लक्षणे अशी असतात:
- योनी व स्त्रीचे बाह्य जननेंद्रियाला खाज, जळजळ आणि वेदना.
- लघवी करताना आग होणे .
- करडा-हिरवट स्त्राव.
- दुर्गंधीयुक्त स्त्राव.
याची मुख्य कारणं काय आहेत?
व्हॅजिनायटिस मुख्यतः योनीमध्ये सूक्ष्मजीवांचे संतुलन बदलल्यामुळे होतो आणि या विकारासाठी जबाबदार घटक ही आहेत:
- असुरक्षित संभोग किंवा एकाधिक संभोगाचे पार्टनर असणे.
- इंट्रायूटेरिन डिव्हाइस (IUD) वापरणे.
- अनियंत्रित मधुमेहाचा विकार.
- गरोदरपणा.
- औषधे उदा., अँटीबायोटिक्स, स्टेरॉइड्स.
- कॅन्डिआसिसिस, ट्रायकोमोनियासिस सारखे संसर्ग.
- साबण, डिटर्जेन्ट्स, स्प्रे, शॉवर, शुक्राणुनाशक किंवा फॅब्रिक सॉफ्टनेर्स ची ॲलर्जी.
- हार्मोनल बदल.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर आधी पूर्ण वैद्यकीय इतिहास घेतात, त्यानंतर सखोल ओटीपोटाची परीक्षा (असामान्य स्त्राव, त्याचा रंग, वास आणि गुणवत्ता तपासण्यासाठी)करतात. ते कधीकधी योनीच्या नमून्यांचा सूक्ष्म अभ्यासाचा सल्ला देतात.
- जीवाणूंच्या संसर्गासाठी तोंडावाटे किंवा स्थानिक स्वरूपाचा अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो.
- बुरशीजन्य संसर्गासाठी अँटीफंगल क्रीम किंवा सपोझिटरीजचा उपचार केला जातो.
- ट्रायकोमोनिअसिसचा सिंगल डोज अँटीबायोटिकने उपचार केला जातो आणि दोन्ही भागीदारांना उपचारांची आवश्यकता असते.
- ॲलर्जीच्या बाबतीत, ॲलर्जीचा संपर्क मर्यादित असावा किंवा ॲलर्जन काढून टाकावे.
व्हॅजिनायटिस प्रतिबंधित करण्यासाठी:
- शॉवर घेणे किंवा व्हजायनल स्प्रेचा वापर टाळावा.
- कंडोमचा वापर प्रोत्साहित करावा.
- उष्णता आणि आर्द्रता राखणारे कपडे टाळले पाहिजेत.
- अंडरवेअर सुती आरामदायक कापडाचे असावे.
- वारंवार अंडरवेअर बदलावेत, विशेषत: मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.