बी1 जीवनसत्वाची (व्हिटॅमिन) कमतरता म्हणजे काय?
बी 1 जीवनसत्व म्हणजेच थायमीन, हे आपल्या शरीराचे कार्य योग्य पद्धतीने सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेले महत्वाचे जीवनसत्व आहे. बी 1 जीवनसत्वाची कमतरता निरनिराळ्या परिस्थिती निर्माण करतात, त्यापैकी काही हानिकारक असू शकतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सामान्य लक्षणे
- थायमीनच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा रोग होतो. बेरीबेरी चे दोन प्रकार आहेत - ड्राय/ कोरडे आणि वेट/आर्द्र बेरीबेरी.
- कोरड्या बेरीबेरीमध्ये मज्जारज्जूवर परिणाम होतो आणि रुग्णाला वेदना आणि थकव्यासोबत बधिरता आणि हातापायाला मुंग्या येतात.
- हृदयाचे वाढते आकारमान, श्वासोच्छवासाची कमतरता, हातापायांना सूज आणि हृदयाची गती वाढणे ही आर्द्र बेरीबेरीची लक्षणे आहेत.
इतर लक्षणे
- रुग्ण एनोरेक्सिक होऊ शकतो आणि त्याचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
- माणसाच्या मानसिक स्वास्थावरसुद्धा परिणाम होतो, आणि त्याला मानसिक गोंधळ आणि स्मृती कमी होणे असे अनुभव येऊ शकतात.
- मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये थायमीनमुळे वर्निक-कोसाकॉफ सिंड्रोम होतो ज्यामध्ये माणसाला समन्वायामध्ये कमतरता, स्नायूमध्ये अशक्तपणा, दुहेरी दृष्टी तसेच शरीराचा तोल जाणे असा त्रास होतो.
बी 1 जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मज्जारज्जूचे कायमस्वरूपी नुकसान होणे, कोमा मध्ये जाणे व हृदय बंद होणे असे कॉम्पिकेशन्स होऊ शकतात.
याची मुख्य कारणे काय आहेत?
-
अपुरे आहार सेवन किंवा अयोग्य पद्धतीने (पोषणमूल्यांचे) शोषण यांमुळे कोणत्याही पोषणद्रव्याची कमतरता निर्माण होते.
काही जोखीमेच्या गोष्टींमुळे एखादी व्यक्ती थायामीनच्या कमतरतेला बळी पडते.
- मद्यपानामुळे थायमीन शरीरात कमी शोषला जातो त्यामुळे तो एक जोखीमेचा घटक आहे.
- जे मूत्रपिंडाचे जुने रुग्ण आहेत आणि जे डायुरेटीक्स घेत आहेत त्यांना थायमीनच्या कमतरतेचा जास्त धोका असतो.
- आहारसंबंधी घटकसुद्धा जोखीम वाढवतात, जसकी क ज्या आहारात पांढरा भात हा मुख्य घटक असतो त्यापासून थायमीन खूपच कमी प्रमाणात मिळते.
- कॅन्सर आणि एच. आय.व्ही. बाधित रुग्णांना बी 1 जीवनसत्वाच्या कमतरतेचा अधिक धोका असतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
बी 1 जीवनसत्वाच्या कमतरतेचे निदान लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि चाचण्या यावरून केले जाते.
- रक्ताच्या सेल्स मध्ये थायमीन पायरोफॉसफेट ची पातळी तपासायला विशेष चाचण्या केल्या जातात.
- निदानासाठी थायमीनचे शोषण आणि थायरॉईड च्या कामासाठी आवश्यक उत्प्रेरकाराची पातळी तपासायला चाचण्या केल्या जातात.
प्राथमिक उपचारामध्ये तोंडावाटे किंवा शिरेमध्ये इंजेक्शन देऊन थायामीन दिले जाते. याने लक्षणे लगेच कमी होऊ लागतात.
- मज्जासंस्थेच्या तक्रारी दूर होण्यास जास्त कालावधी लागतो. उपचारामध्ये प्रामुख्याने व्यायाम आणि काही महिन्यांसाठी थायमीनचे ॲडमिनीस्ट्रेशन याचा समावेश होतो.
- पोषकद्रव्याने परिपूर्ण असलेला, अतिशय समतोल आहार आणि थायमीनची पुरके (सप्लीमेंट्स) घेणे यामुळे परिस्थितीमध्ये सुधारणा होते. संपूर्ण धान्य, मटण, सोयाबीन (बीन्स) आणि दाणे (नट्स) हे थायमीनचे परिपूर्ण स्रोत आहेत.