सरव्हायकलचे (मान) दुखणे काय आहे?
मानेची वेदना ही एक सामान्य स्थिती आहे जी पुरुष आणि स्त्रिया, सामान्यत: त्यांच्या आयुष्याच्या मधल्या टप्प्यात अनुभवतात. मानेच्या मणक्यात याची उत्पत्ती झाल्यामुळे त्याला सरव्हायकलचे दुखणे देखील म्हणतात. सरव्हायकलचे दुखणे सामान्यत: मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डरमुळे होतो आणि मानेभोवतील स्नायूंमध्ये हलक्या वेदनेपासून मानेच्या सामान्य हालचालींमध्ये अडथळा आणि शरीराच्या वरच्या भागात संवेदनांचा अभाव देखील होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मानेचे दुखणे ही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन परिस्तिथी असू शकते. काही मुख्य संबंधित चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- मानेच्या स्नायूचा ताठस्थपणा.
- मानेच्या हालचालीत अडथळा.
- शरीराच्या वरच्या भागात मुंग्या येणे किंवा तो भाग बधिर पडणे.
- मानेच्या भागात वेदना होणे.
- खांद्यात वेदना होणे किंवा वरच्या भागात वेदना होणे.
आणखी एक दुर्मिळ लक्षण म्हणजे माईग्रेनचा झटका. तीव्र वेदना होत असतील तर काही न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
मानेच्या वेदना वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात.सामान्य कारणे आहेत:
- मानेची जबर ओढाताण.
- मानेला झालेली दुखापत.
- खेळतांना झालेली जखम.
- डिजनरेटिव्ह डिस्क डिझीज.
- काम करताना चुकीची बैठक.
- मानेला झटके देणारी हालचाल.
- संगणक / मोबाइल फोनचा अत्याधिक वापर.
- थकवा किंवा अपूर्ण झोप.
- सर्व्हाइकल स्पॉन्डीलायसिस, संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या परिस्थिती.
- तणाव आणि चिंता यांसारखे भावनिक घटक.
क्वचितच, मानेच्या दुखण्याचे कारण हे मानेच्या जवळपास ट्युमरची होणारी वाढ असू शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
मानेच्या वेदनांचे कारण पूर्णपणे वैद्यकीय इतिहासावर आणि शारीरिक तपासणीवर आधारित असते. निदान करण्यासाठी पुढील साधनांचा वापर केला जाऊ शकतो.
- मेरुदंडाचा एक्स-रे.
- मानेचा एमआरआय (MRI).
- सी-रीॲक्टिव्ह प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी साठी रक्त तपासणी, विशेषतः जर रुग्णामध्ये पूर्वी सूज संबंधी विकाराचे निदान झाले असेल तर.
मानेच्या वेदनासाठीच्या उपचारांमध्ये समाविष्ट आहे:
- फिजियोथेरेपी - अल्पकालीन संयुक्तपणे हालचाल न करणे.
- मानेचा व्यायाम.
- स्पंदीत इलेक्ट्रोमॅगनेटिक फील्ड थेरेपी.
- वेदना कमी करण्यासाठी नॉन स्टेरॉइडल अँट-इंफ्लेमेटरी ड्रग्स (सूज न येऊ देणारी औषध) आणि स्नायू शिथिल करणे या सारखे उपाय.
- गरम संकुचन करणे.
तीव्र वेदनांचा उपचार याप्रकारे केला जाऊ शकतोः
- स्नायू मजबूत करणे आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम.
- फिजियोथेरपी आणि डियथरमी.
- वेदनाशामक, अँटी-इंफ्लेमेटरी औषधं आणि स्नायू शिथिलके.
- काउंसिलिंग.
- ॲक्यूपंक्चर सारख्या वैकल्पिक चिकित्सा.
- न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन असल्यास शस्त्रक्रिया.
मानेच्या वेदना मणक्यापासून सुरु होतात आणि पेशींच्या वेदना ते न्यूरोलॉजिकल कॉम्पिकेशन्स चे कारण बनू शकतात. फिजीओथेरपी, व्यायाम आणि औषधोपचाराने त्याचे उपचार केले जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणी व्यवस्थित बैठक आणि योग्य व्यायाम या वेदनादायक परिस्थितीस प्रतिबंध घालण्यात मदत करू शकते.