क्राॅन रोग म्हणजे काय?
क्राॅन रोग हा इन्फ्लेमेटरी बाउल डिझीज (आयबीडी) चा एक प्रकार आहे. यात पाचन प्रणालीत खूप सूज येते आणि तोंडापासून गुदद्वारापर्यंतील कोणत्याही भागावर परिणाम करू शकते. हा रोग प्रामुख्याने विकसनशील देशात दिसून येतो आणि शहरीकरणाचा परिणाम आहे. याची जगभरात 0.3% पेक्षा जास्त प्रमाणात बाधा होते. तुलनात्मक निरीक्षण असे दाखवते की इतर आशियाई देशांपेक्षा भारतामध्ये रोगाचा प्रसार सर्वात जास्त आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
प्रामुख्याने, क्राॅन रोगात लहान आतड्याच्या खालील विभागावर परिणाम होतो. चिन्हे आणि लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात आणि सामान्यतः हळूहळू विकसित होतात, परंतु काहीवेळेस अचानकपणे उद्भवू शकतात. रोग झाला असताना दिसून येणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- सतत होणारा अतिसार.
- ताप.
- थकवा.
- पोटात दुखणे आणि कळ येणे.
- रक्तरंजित मल.
- तोंडामध्ये फोड येणे.
- कमी भूक.
- वजन कमी होणे.
- फिस्टुला तयार झाल्यामुळे गुदद्वार भागामध्ये वेदना.
क्राॅन रोगाचे गंभीर स्वरूपात खालील लक्षणे दिसतात:
- डोळा, सांधे आणि त्वचेची सूज.
- हिपॅटिक आणि बिलियरी नलिकांची सूज.
- मुलांमध्ये विलंबित वाढ आणि लैंगिक विकास.
याची मुख्य कारणे काय आहेत?
पुरूष आणि स्त्री या दोघांवर याचे सारखेच परिणाम होतात आणि सामान्यपणे 15-35 वर्षे या वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. क्राॅन रोगासाठी जबाबदार असे विशिष्ट कारण नाही आहे. काही घटक जे रोगाचा धोका वाढवतात ते खालीलप्रमाणे आहेत:
- आनुवंशिकता: क्राॅन रोगाचा कौटुंबिक इतिहास असलेली व्यक्ती सर्वात जास्त धोक्यात असते.
- रोगप्रतिकारक प्रणाली: असे सांगितले जाते की व्हायरस किंवा बॅक्टेरियम अस्वाभाविक इम्युन-मेडिएटेड प्रतिसाद चालू करतात ज्यामुळे रोगप्रतिकारक प्रणाली पाचन तंत्रातील पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे सूज येते.
- शहरी भागात राहणे यासारखे पर्यावरणीय घटक आणि फॅटयुक्त आणि रिफाइन्ड खाद्यपदार्थांचे सेवन खूप मोठी भूमिका बजावते.
- पूर्व युरोपियन वंशाच्या लोकांना याचा धोका जास्त आहे.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
काही सामान्य चाचण्या ज्या करायला सांगितले जाऊ शकते त्या खालीलप्रमाणे आहेत:
- रक्त चाचण्या:
- इमेजिंग चाचण्या:
- स्टॅन्डर्ड आणि काॅन्ट्रास्ट एक्स-रे.
- कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन.
- ल्युकोसाइट स्किन्टिग्राफी.
- एन्डोस्काॅपी.
- मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग(एमआरआय).
औषधे, आहारातील बदल आणि कधीकधी प्रभावित भाग काढण्यासाठी शस्त्रक्रिया यांच्या वापरावर उपचार मुख्यतः केंद्रित असते.
- रोगप्रतिकारक प्रणाली नियंत्रित करणारे आणि सूज कमी करणारी औषधे सामान्यतः लिहून दिले जातात. इम्यूनोमाॅड्यूलेटर चा उपयोग ॲन्टी-इन्फ्लामेटरी एजंट सोबत केला जाऊ शकतो.
- या स्थितीत भूक कमी झाली असल्याने, आहारातील बदल संतुलित आहार घेण्यास मदत करतात. मसालेदार, तेलकट आणि फायबरयुक्त पदार्थांऐवजी बेचव पदार्थ खाल्याने सूज कमी होण्यास मदत होते.
- शस्त्रक्रिया हा एक प्रभावी नाॅन-ड्रग उपाचार पर्याय मानला जातो. जवळजवळ 70% रुग्णांना अखेरीस शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.
स्वतःच्या-काळजीचे आणि फाॅलो-अप उपाय:
- तुम्ही घेतलेल्या सर्व निर्धारित आणि ओव्हर-द-काउंटर (ओटीसी) औषधे यांची यादी बनवा. हे तुम्हाला आणि तुमच्या डाॅक्टरांना तुमच्या स्थितीबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करते आणि तुम्हाला सानुकूल उपचार योजना तयार करण्यात मदत करते.
- नाॅन-स्टिराॅइडल ॲन्टी-इन्फ्लेमेटरी ड्रग्ज टाळा, कारण ते स्थिती आणखी खराब करू शकतात. जर तुम्हाला ते घेण्याची गरज असेल तर प्रथम तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
- नियमित मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळा, कारण हे तुमची अस्वस्थता वाढवू शकतात.
- तुमची लक्षणे ट्रॅक करा आणि त्याची नोंद करा.
- नियमित फाॅलो-अप भेटीसाठी जा.