कुशिंग सिंड्रोम - Cushing's Syndrome in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

November 30, 2018

July 31, 2020

कुशिंग सिंड्रोम
कुशिंग सिंड्रोम

कुशिंग सिंड्रोम काय आहे?

कुशिंग सिंड्रोम हा हार्मोनल डिसऑर्डर आहे, जो कोर्टिसोल हार्मोनच्या (सामान्य कॉर्टिसोल पातळीपेक्षा जास्त) शरीरातील असंतुलनमुळे होतो. कॉर्टिसोलला "तणाव संप्रेरक" म्हटले जाते कारण तणाव च्या काळात त्याचे स्तर वाढते. हे अंतर्गत (अंतर्गत घटकांमुळे बनलेले) किंवा बहिर्गत (बाह्य घटकांमुळे झाले) असू शकतात. परिवर्तनीय अंदाजानुसार जगभरातील प्रत्येकी दशलक्ष व्यक्तीमध्ये 40 ते 70 व्यक्ती कुशिंग सिंड्रोममुळे प्रभावित असतात. अनेक लोकसंख्या अभ्यासानुसार भारतात याचे प्रमाण प्रत्येकी दशलक्ष व्यक्तीमध्ये 0.7 ते 2.4 व्यक्ती एवढे आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

रुग्ण चिकित्सेची लक्षणे बदलू शकतात आणि त्यात खालील गोष्टी समाविष्ट आहेत:

प्रौढांमध्ये, कुशिंगचा सिंड्रोम सहसा 30 ते 50 वयोगटाच्या दरम्यान होतो पण मुलांमध्ये देखील तो विकसित होऊ शकतो. कुशिंगच्या सिंड्रोमची घटना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतात (3: 1 स्त्रिया ते पुरुष प्रमाण). काही असामान्य आढळणारे वैशिष्ट्य असे आहेत:

इतर रोग (विषम निदान) ज्यामध्ये समान लक्षणे असू शकतात :

याची मुख्य कारणं काय आहेत?

हा सिंड्रोम विकसित होण्याचे मुख्य कारण म्हणजे कॉर्टिसोलच्या अति डोजचा सतत वापर, विशेषतः ग्लुकोकोर्टिकोइड्सचा. कॉर्टिसोल उपयुक्त आहे कारण ते खालील कार्य करते:

  • रक्तदाब आणि रक्तातील ग्लूकोजची पातळी राखते.
  • दाहक परिस्थिती कमी करते.
  • अन्नाचे शरीराच्या आत वापरण्यायोग्य ऊर्जेत रूपांतरित करते.

पण, असंतुलन कोर्टिसोलचे असामान्य स्तरात रूपांतरित होऊ शकते ज्यामुळे दीर्घकाळात कॉम्पिकेशन्स निर्माण करू शकते. हे अंतर्गत किंवा बहिर्गत (दीर्घ कालावधीसाठी मौखिक कॉर्टिकोस्टिरॉईड्सचा वापर) असू शकते.

इतर कारणे खालील प्रमाणे आहे:

  • पिट्यूटरी ग्रंथींचा ट्यूमर.
  • एक्टोपिक ट्यूमर जे हार्मोन एसीटीएच तयार करतात.
  • ॲड्रिनल ग्रंथींचा ट्यूमर.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदानात मुख्यतःअसे केले जाऊ शकते :

  • वैद्यकीय इतिहास.
  • शारीरिक परीक्षा.
  • लॅब चाचण्या.

ग्लुकोकोर्टिकोइड्स मुख्यतः अँटी-इंफ्लॅमेटरी, ऑटोइम्यून आणि नेओप्लास्टिक (ट्यूमर) रोगासाठी वापरली जातात. म्हणून, रुग्णाची योग्य औषधे इतिहास आवश्यक आहे. केल्या जाणाऱ्या इतर निदानात्मक चाचण्या या आहेत:

  • 24-तास मूत्र-मुक्त कॉर्टिसॉल (यूएफसी).
  • रात्री उशिराचे-सॅलीव्हरी कोर्टिसॉल.
  • कमी- मात्रेत डेक्सामेथासोन सप्रेशन टेस्ट (एलडीडीएसटी).
  • रात्रभर डेक्सामेथासोन सप्रेशन टेस्ट (ओएनडीएसटी).
  • ॲड्रेनल ग्रंथीचा सीटी स्कॅन.

कुशिंग सिंड्रोमचे कारण असू शकतील अशा अंतर्भूत स्थितीचे निदान करण्यासाठीचे परीक्षण:

  • कॉर्टिकोट्रॉपिन रिलीझिंग हार्मोन टेस्ट (सीआरएच).
  • हाय-डोस डेक्सॅमेथेसोन सप्रेशन टेस्ट (एचडीडीएसटी).
  • बायलॅटरल इंफेरीअर पेट्रोसल सायनस सॅम्पलिंग (बीआयपीएसएस).

कुशिंगच्या सिंड्रोमसाठी उपचारात खालील बाबींचा समावेश आहे:

  • वैद्यकीय थेरपी: या सिंड्रोम मूलभूत कारणानुसार खालीलप्रमाणे औषधं दिली जातात.
    • स्टेरॉइड उत्पादन रोखण्यासाठी.
    • ग्लुकोकोर्टिकोइड रिसेप्टर इनहिबिटर.
    • एसीटीएच रीलीझमध्ये बदल करण्यासाठी .
    • ॲड्रेनोलिटिक औषधे.
    • आपण कॉर्टिसोल घेतल्यास, लक्षणे कमी करण्यासाठी कमी डोस निर्धारित केला जातो.
  • शस्त्रक्रियाः
    • ट्यूमर शस्त्रक्रिया किंवा एड्रेनल ग्रंथी काढणे सूचित केले जाऊ शकते.
  • पिट्यूटरी रेडिओथेरेपी.

स्वत:ची काळजी घेण्याच्या टिप्सः

  • डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधोपचारांचे पालन करा.
  • धूम्रपान करणे आणि मद्यपानाचा वापर टाळा, कारण ते अधिक नुकसान करू शकतात आणि गुंतागुंत होऊ शकते.
  • चांगल्या- संतुलित आहाराचे अनुसरण करा किंवा एक आहारतज्ञाचा सल्ला घ्या.
  • नियमित सौम्य व्यायाम करा कारण अति व्यायाम किंवा मैदानावर खेळताना फ्रॅक्चरचा धोका असू शकतो.
  • तणाव टाळा जेणेकरुन कोर्टिसोलचे अतिप्रजनन कमी होईल.

वरील उपाय विवेकबुद्धीने पाळल्यास कुशिंग सिंड्रोम व्यवस्थापित केला जाऊ शकतो आणि आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



संदर्भ

  1. Susmeeta T Sharma. et al. Cushing’s syndrome: epidemiology and developments in disease management.Clin Epidemiol. 2015; 7: 281–293. PMID: 25945066
  2. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases. [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Cushing's Syndrome
  3. Ariacherry C. Ammini. et al. Etiology and clinical profile of patients with Cushing's syndrome: A single center experience. Indian J Endocrinol Metab. 2014 Jan-Feb; 18(1): 99–105. PMID: 24701438
  4. The Pituitary Society. [Internet]. Beverly Blvd, Los Angeles; Cushing's Syndrome & Disease - Symptoms
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Cushing's Syndrome

कुशिंग सिंड्रोम चे डॉक्टर

Dr. Narayanan N K Dr. Narayanan N K Endocrinology
16 Years of Experience
Dr. Tanmay Bharani Dr. Tanmay Bharani Endocrinology
15 Years of Experience
Dr. Sunil Kumar Mishra Dr. Sunil Kumar Mishra Endocrinology
23 Years of Experience
Dr. Parjeet Kaur Dr. Parjeet Kaur Endocrinology
19 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या