एंडोमेट्रियल हायपरप्लासिया काय आहे ?
गर्भाशय हा तीन थरांचा बनलेला असतो ते म्हणजे पेरिमेट्रीयम,मायोमेट्रीयम आणि एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम हा सर्वात आतील थर आहे जो लहान इपीथिलीयल पेशींनी बनलेला असतो. अंडाशयाने सोडलेल्या हार्मोन च्या क्रियेअंतर्गत तो वाढतो. हा एंडोमेट्रियम आहे जो प्रत्येक मासिक पाळी दरम्यान वाढतो आणि गळून पडतो, त्यामुळेच रक्तस्त्राव होतो. इस्ट्रोजेनच्या पातळीतील काही विशिष्ट बदलांमुळे, हा एंडोमेट्रियम जाड बनून राहतो आणि ही स्थिती एंडोमेट्रियल हायपरप्लासिया म्हणून ओळखली जाते. हा कर्करोग नाही परंतु काही प्रकरणांमध्ये तो कर्करोग होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
एंडोमेट्रियल हायपरप्लासियाची लक्षणे केवळ गर्भाशया पर्यंतच मर्यादित नाहीत; त्याची सामान्यीकृत लक्षणे देखील दिसू शकतात, ज्यात खालील समाविष्ट आहेत:
- असामान्य मासिक रक्तस्त्राव (जास्त रक्तस्त्राव किंवा अधिक वारंवार मासिक पाळी)
- पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव
- मेनोपॉझ नंतर देखील योनीतून रक्तस्त्राव
- जास्त रक्त गेल्याने ॲनिमिया
- अशक्तपणा
याची मुख्य कारणं काय आहेत ?
एंडोमेट्रियम चे कार्य एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन पातळी बद्दल फार संवेदनशील असते. साधारणपणे, एस्ट्रोजन तो आहे जो एंडोमेट्रियलच्या आतील थराच्या जाडीला वाढण्यास उत्तेजना देतो. जेव्हा एस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी तुलनेने कमी असते तेव्हा याचा परिणाम एंडोमेट्रियल हायपरप्लासिया हा होतो. हे सामान्यतः त्या महिलांमध्ये होते त्यांमध्ये खालील विकार पाहिले जाऊ शकतात:
- लठ्ठपणा
- हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपीचा (एचआरटी) दीर्घकाळ वापर
- वांध्यत्व
- पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज (पीसीओडी)
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
वैद्यकीय इतिहासासह क्लिनिकल चाचणीत एंडोमेट्रियल हायपरप्लासिया दिसून येतो. खाली काही तपासण्या दिल्या आहेत जे निदानाची पुष्टी करण्यासाठी आवश्यक आहेत. सोबतच कर्करोगापासून मुक्त होण्यासाठी देखील आवश्यक आहे.
- पेल्व्हिक अल्ट्रासाऊंड - एंडोमेट्रियमची जाडी माहिती करण्यासाठी आणि त्याचे कारण शोधण्यासाठी
- ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड - एंडोमेट्रियममधील बदलांचे अधिक अचूकपणे मूल्यांकन करण्यासाठी
- हिस्टेरोस्कोपी - एन्डोस्कोपचा वापर करून एंडोमेट्रियम पाहण्यासाठी.
- एंडोमेट्रियल बायोप्सी -निदानाची पुष्टी करण्यासाठी आणि एंडोमेट्रियल कँन्सर ची शक्यता घालवायला टिश्यूचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले केले जातात.
कर्करोगाची पुढील शक्यता घालवण्यासाठी रुटीन पेल्व्हिक अल्ट्रासाऊंड दर 2-3 वर्षांनी केले जाते.
एंडोमेट्रियल हायपरप्लासियासाठीच्या उपचार पद्धतींमध्ये खालील समाविष्ट आहे
- निरीक्षण - ही सर्वात सामान्यतः वापरली जाणारी पद्धत आहे कारण मेनोपॉझ नंतर एस्ट्रोजेनच्या अनुपस्थितीत हायपरप्लासिया कमी होतो किंवा लक्षणे कमी होतात.
- वैद्यकीय व्यवस्थापन - स्पष्ट लक्षणे असल्यास किंवा मेनोपॉझ नंतर ही योनीतून स्त्राव होत असल्यास तोंडावाटे खायला प्रोजेस्टेरॉन च्या गोळ्या दिल्या जातात.
- सर्जिकल मॅनेजमेंट - काही रुग्णांमध्ये वैद्यकीय थेरपी नंतरही सतत लक्षणे दिसतात. अशा प्रकरणात एंडोमेट्रियम हा एंडोमेट्रियल अब्लेशन पद्धतीद्वारे साफ केला जातो किंवा गंभीर प्रकरणात अंडाशयांसह संपूर्ण गर्भाशय काढले जाते.