यकृताचा आकार वाढणे म्हणजे काय?
जेव्हा यकृताचा आकार वेगवेगळ्या कारणांमुळे वाढतो जसे साधा व्हायरल संसर्ग किंवा गंभीर वैद्यकीय स्थिती जसे हृदय निकामी पडणे, तेव्हा वाढीव यकृत किंवा हेप्टोमेगली होतो.सहसा, मूळ कारणांचा उपचार केल्याने हेप्टोमेगली बरे करण्यास मदत होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बहुतेक बाबतीत, एक वाढलेले यकृत कोणतेही लक्षणे दाखवत नाही, पण मुळ आजारांमुळे याची लक्षणे दिसू शकतात. ती खालील काही असू शकतात:
याची मुख्य कारणं काय आहेत?
यकृत जे शरीराचे विविध कार्यांचे केंद्र आहे, अनेक आजारांमुळे याच्या कार्यामध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे यकृताची वाढ होऊ शकते.
हेप्टोमेगली होण्याची काही सर्वात सामान्य कारणं अशी आहेत:
- यकृताचे रोग
- ॲमीओबीक ॲबस्केसिस-ई. हिस्टोलिटिकाच्या संसर्गामुळे लिव्हरमध्ये पस ने भरलेल्या कॅव्हिटीची निर्मिती.
- हेपेटायटीस.
- सिरोसिस.
- चरबीयुक्त यकृत.
- हेमोक्क्रोमेटोसिस - शरीरात जास्त आयर्न जमा होणे.
- लिव्हर सिस्ट.
- यकृताचे हेमांजिओमास- यकृतातील रक्तवाहिन्यांची विकृती.
- पित्ताशयात अडथळा.
- ॲमीलायोडोसिस.
- विल्सनचा रोग-शरीरात तांबा जास्त प्रमाणात जमा होणे.
- इतर रोग
- यकृताचा कर्करोग.
- लिम्फोमा.
- ल्युकेमिया.
- हृदय निकामी पडणे.
- पेरीकार्डिटिस.
- मलेरिया आणि टायफॉइड सारखे संसर्ग.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
मूळ आजारांची माहिती करुन घेण्यासाठी खालील काही तपासण्या केल्या जाऊ शकतात.
- रक्त तपासणी
- संपूर्ण रक्त तपासणी(कम्प्लिटबं ब्लड काऊंट-CBC).
- लिव्हर फंक्शन टेस्ट.
- सीरम प्रोटिन लेव्हल.
- हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई ॲन्टीजेन /ॲन्टीबॉडीची.पातळी.
- इमेजिंग स्टडिज
- पोटाची सोनोग्राफी.
- पोटाचे सिटी (सीटी) स्कॅन.
- मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅन.
- लिव्हर बायोप्सी- हे यकृत पेशींची आंतरिक संरचना (हेपेटोसाइटस) जाणून घेणे आणि निदानाची पुष्टी करण्यास मदत करते
हेप्टोमेगली चा उपचार पूर्णपणे त्याच्या कारणांवर अवलंबून असतो. जर रोग हा संसर्गाने होत असेल तर ॲन्टीबायोटिक्स दिले जाऊ शकतात; हृदयाचा विकार असल्यास, मूळ आजारांचा उपचार करणे आवश्यक आहे; कधीकधी ते आपोआप बरे होऊ शकतात किंवा केवळ काही सहाय्यक एंझाइमची गरज भासू शकते. कर्करोगामुळे वाढ झाल्यास त्याला शस्त्रक्रिया किंवा किमो-रेडिएशन थेरपीची आवश्यकता भासू शकते.