हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेची पातळी कमी होणे) म्हणजे काय आहे?
हायपोग्लायसेमिया, ज्याला लो ब्लड ग्लूकोज किंवा कमी रक्त शर्करा म्हणून ओळखले जाते, ही मधुमेह मेलिटस ग्रस्त लोकांसाठी एक प्रमुख क्लिनिकल समस्या आहे. जेव्हा रक्तातले ग्लुकोजचे स्तर, जे शरीराचे मुख्य ऊर्जा स्त्रोत आहे, सामान्य पातळीपेक्षा खाली जाते, तेव्हा हायपोग्लायसेमिया होतो.
याचे चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- सौम्य ते मध्यम लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- अनियमित हृदय ताल.
- थकवा.
- अस्थिर शरीर.
- निस्तेज त्वचा.
- चिंता.
- घाम येणे.
- भूक लागणे.
- चिडचिडेपणा.
- तोंडाभोवती मुंग्या येणे.
- गोंधळाने, दिशाभूल होणे आणि चक्कर येणे.
- अशक्तपणा.
- गंभीर लक्षणे ही आहेत:
- अन्न किंवा द्रवपदार्थ खाण्यात अक्षमता.
- दौरे येणे.
- बेशुद्ध होणे किंवा मूर्छित होणे
- झोपेत होणारा त्रास:
- भयावह स्वप्न पडणे.
- खूप घामामुळे कपडे ओले होणे.
- उठल्यावर थकवा आणि अशक्तपणा.
याची मुख्य कारणं काय आहेत?
- हायपोग्लेसेमियाचा सर्वात सामान्य कारणं म्हणजे :
- मधुमेह मेलीटसवर उपचार करण्यासाठी घेतलेली औषधे जसे सल्फोन्यूरियस किंवा मेग्लिटाइनाइड्स.
- उपाशी पोटी मद्यपान करणे.
- पॅनक्रियामध्ये ट्यूमर होणे, ज्यामुळे जास्त प्रमाणात इंश्युलिनच्या ( रक्ताची ग्लूकोजची पातळी कमी करणारा हॉर्मोन)उत्पादनामुळे रक्तात ग्लूकोजची पातळी कमी होते.
- हायपरइन्श्युलिनिझम आणि ग्लूकोज चयापचयचे विकार होणे.
- धोकादायक घटक पुढील प्रमाणे आहेत:
- उशीरा जेवणे किंवा भोजन न करणे.
- कार्बोहायड्रेटचे अपर्याप्त सेवन करणे.
- आजारी असणे.
- शारीरिक क्रियाकलाप वाढणे.
- मूत्रपिंडाचे रोग.
- यकृताचे रोग.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
मधुमेहासाठी औषधे घेत असल्यास, ग्लूकोमीटरच्या मदतीने रक्तामधील ग्लूकोजची पातळी नेहमी तपासावी. हायपोग्लेसेमियाचे निदान करण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणीसह वैद्यकीय इतिहास देखील घेतात. पण, तीव्र हाइपोग्लिसेमियाचे लक्षणे स्पष्ट लक्षात असतात आणि डॉक्टर त्वरित उपचार सुरु करू शकतात. प्रारंभिक डॉक्टरांच्या भेटीदरम्यान कोणतीही लक्षणे नसल्यास डॉक्टर तुम्हाला रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी बोलवू शकतात.
निदानासाठी या चाचण्या केल्या जाऊ शकतात:
- जेवण करण्यापूर्वी आणि नंतर रक्तामधील शर्कराची पातळी मोजण्यासाठी चाचणी.
- लक्षणे आढळल्यास रक्तामधील शर्कराची पातळी मोजण्यासाठी चाचणी.
हायपोग्लेसेमियाच्या ताबडतोब उपचारांमध्ये 15 ते 20 ग्रॅम कार्बोहायड्रेटचे सेवन करणे जसे ग्लूकोजची गोळी, फळांचे ज्युस, साखरेच्या गोळ्या, मध, किंवा साधी साखर, जी सहजपणे ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतील.
गंभीर प्रकरणांमध्ये इंजेक्शन किंवा इंट्राव्हेनस ग्लूकोज प्रशासित केले जाऊ शकते.
तात्काळ उपचारानंतर दर 15 मिनिटांनी रक्त शर्कराची पातळी पुन्हा तपासली पाहिजे आणि त्यानंतर त्याची नियमित तपासणी करावी. उपचार करण्याच्या हेतूने मधुमेहाच्या उपचारांसाठी किंवा पॅनक्रियाच्या ट्यूमर काढून टाकण्यासाठी घेतलेल्या औषधांमध्ये बदल केले जातात.