जॉक इच काय आहे?
जॉक इच हे मांडीतील त्वचेचे फंगल इन्फेक्शन आहे. याला गजकर्ण/रिंगवार्म किंवा वैद्यकीयदृष्ट्या मांडीत होणारा टिनिया क्रूरिस असेही म्हणतात. त्वचेच्या संसर्गाचा हा एक सामान्य प्रकार आहे आणि वरकरणी मांडीतील त्वचेवर परिणाम करतो. ही एक जीवघेणी स्थिती नसली तरी यामुळे लक्षणीय अस्वस्थता आणि सामाजिक अवघडलेपण येऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जॉक इच हा मांडीच्या आसपासचे क्षेत्र प्रभावित करतो. पण, ते आतल्या मांड्यांमध्ये, नितंबांमध्ये आणि काही प्रकरणांमध्ये ओटीपोटात पसरू शकते. जननेंद्रिय सामान्यपणे प्रभावित होत नाहीत. ॲथलीट्स किंवा लठ्ठ लोकांमध्ये हे वारंवार आढळते. जॉक इचची खालील चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात:
- प्रभावित त्वचेच्या रंगात बदल, सामान्यतः प्रभावित भाग लालसर दिसून येतो.
- गोलाकाआकाराच्या रॅशसारखे दिसणे. (अधिक वाचा: त्वचेवरील रॅशचे उपचार)
- जखमेच्या सीमा तीव्रपणे मर्यादित असतात.
- प्रभावित क्षेत्राच्या केंद्रस्थ मंडळांमधील सामान्य दिसणाऱ्या त्वचेची उपस्थिती असू शकते.
- जखम थोडी उभारलेली दिसते.
- जखमांसह फोड येऊ शकतात.
- खाज आणि अस्वस्थता सामान्यतः दिसून येते.
- व्यायामांमुळे लक्षणं आणखी बिघडतात.
हा एक वारंवार होणारे संसर्ग आहे. जर पूर्वी कोणाला जॉक इचचा त्रास झाला असेल तर भविष्यात त्यांना हा त्रास पुन्हा होण्याची शक्यता असते. तसेच, काही वेळा मांडीबरोबरच पायलाही संसर्ग झाल्याचे दिसून येतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
हे एक फंगल इन्फेक्शन आहे आणि संसर्गजन्य आहे. बुरशी ओलसर आणि उबदार त्वचेच्या पृष्ठभागावर वाढत असते. म्हणून, घट्ट किंवा ओले आतले कपडे घातल्याने धोका वाढू शकतो. ज्या जास्त वजन असलेल्या व्यक्तीची त्वचा घासली जाते त्यांना देखील याचा जास्त धोका असतो. जॉक इच संक्रमित टॉवेल, बेडशीट इत्यादी द्वारे पसरू शकतो. तो आपल्या शरीराच्या इतर भागांमध्ये संपर्काद्वारे देखील पसरू शकतो, कारण हा अत्यंत संसर्गजन्य आहे. महिलांपेक्षा पुरुष याने जास्त प्रभावित होतात. एपीडर्मोफायटन फ्लॉक्कोसम आणि ट्रायकोफिटन रुब्रम या बुरशीमुळे जॉक इच होतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
रुग्णाचा वैद्यकीय इतिहास घेऊन आणि प्रभावित क्षेत्राची तपासणी करून निदान केले जाऊ शकते. शिवाय, पोटॅशियम हायड्रॉक्साइड (KOH) स्लाइड च्या मदतीने 4-6 आठवड्यांत बुरशीच्या प्रकाराची पुष्टी केली जाऊ शकते. टिनिया क्रूरिस हे सौम्य इन्फेक्शन आहे म्हणून सामान्यत: दिवसातून 2-3 वेळा वापरल्या जाणाऱ्या टोपिकल अँटीफंगल्सने उपचार केला जाऊ शकतो. इन्फेक्शनचे सामान्यतः 3-4 आठवड्यांत पूर्णपणे निराकरण होते. क्षेत्र कोरडे ठेवण्याची आणि स्वच्छता राखण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.