मेलॅनिन ची कमतरता - Melanin Deficiency in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

मेलॅनिन ची कमतरता
मेलॅनिन ची कमतरता

मेलॅनिन ची  कमतरता काय आहे ?

त्वचेमध्ये असलेले विशिष्ट सेल मेलेनॉसाइट्स हे मेलॅनिन ची निर्मिती करतात, जे एक रंगद्रव्य आहे ज्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. ह्या सेल्स ला काही हानी झाल्यास मेलॅनिन च्या निर्मितीत फरक पडतो. काही व्याधींमध्ये शरीराच्या निवडक भागावर परिणाम होतो तर  इतर वेळी पूर्ण शरीरावर परिणाम होतो. जास्तीच्या मेलॅनिन मूळे त्वचेचा रंग डार्क होतो तर कमी मेलॅनिन मूळे त्वचा गोरी दिसते . जेव्हा मेलॅनिन ची पातळी विशिष्ट पातळीपेक्षा कमी होते ,तेव्हा व्हिटीलीगो सारखे रोग,त्वचेवर पांढरे डाग ,अल्बिनिज्म आणि इतर गोष्टीमुळे त्वचेच्या रंगात फरक पडू शकते.

याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

मेलॅनिन ची कमतरता ही वेगवेगळ्या रोगांच्या रूपात दिसू शकते त्यापैकी लक्षणं आणि चिन्हं खाली दिलेले आहे:

  • कमी वयात केस, दाढी ,मिशी, भुवया आणि पापण्या पांढऱ्या होतात.
  • तोंडाच्या आतल्या त्वचेचा रंग पांढरा होतो.
  • त्वचेचा रंग जाणे.
  • त्वचेच्या एका किंवा जास्त भागाचा रंग जाणे.
  • शरीराच्या फक्त एका भागाचा रंग जाणे.  
  • पूर्ण शरीराचा रंग जाणे.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

मेलॅनिन ची कमतरता ही त्वचेच्या विशिष्ट परिणामामुळे होते जिथे मेलॅनोसाईट्स वर परिणाम होतो आणि, त्यामुळे मेलॅनिन च्या निर्मितीवर परिणाम होतो. मेलॅनिन च्या कमतरतेला खालील गोष्टी कारणीभूत आहे:

  • अनुवांशिक कमतरता ज्यामुळे थोडेसे किंवा पूर्ण मेलॅनिन नाहीसे होते. उदा., अल्बिनिज्म.
  • ऑटोइम्यून विकारामूळे शरीराच्या काही किंवा संपूर्ण भागात मेलॅनोसाईट्स नष्ट होतात, उदा., व्हायटिलिजिओ.
  • त्वचेला इजा होणे जसे अल्सर,भाजणे,फोड येणेसंसर्ग,  इत्यादी. मूळे त्वचेच्या सेल्सला कायमस्वरूपी हानी पोहोचवते आणि हानी पोहोचलेल्या त्वचेचेवर मेलॅनिन परत बनू शकत नाहो.

याचे निदान आणि उपचार काय आहे?

याचे निदान खालील गोष्टीवर अवलंबून आहे:

  • व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास.
  • पांढऱ्या डागांची शारीरिक तपासणी.
  • मधुमेह किंवा थायरॉईड आहे की नाही यासाठी रक्ताची चाचणी.
  • प्रभावित त्वचेची बायोप्सी

मेलॅनिन च्या कमतरतेवरचे उपचार हे त्याच्या कारणावर अवलंबून आहे. डॉक्टर खालील उपचार पद्धती  सुचवू शकतात:

  • कॉर्टिकोस्टिरॉईड क्रीम.
  • अरुंद -बँड अल्ट्रा व्हायोलेट बी थेरपी.
  • फोटोकेमोथेरपी.
  • लेझर पद्धती.

काही परिणामकारक घरेलू  उपाय खालील प्रमाणे आहे :

  • सनस्क्रीन्स.
  • सौंदर्यप्रसाधने जसे कॉन्सिलर.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Skin Pigmentation Disorders.
  2. Stanford Children's Health. [Internet]. Palo Alto, California, United States; Skin Pigment Disorders.
  3. American Vitiligo Research Foundation. [Internet]. Clearwater, Florida, United States; Vitiligo Signs & Symptoms.
  4. British Association of Dermatologists. [Internet]. United Kingdom. Vitiligo.
  5. TeensHealth. [Internet]. The Nemours Foundation, Jacksonville, Florida. Vitiligo.

मेलॅनिन ची कमतरता साठी औषधे

Medicines listed below are available for मेलॅनिन ची कमतरता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.