मेटाबॉलिक सिंड्रोम - Metabolic Syndrome in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

April 25, 2019

March 06, 2020

मेटाबॉलिक सिंड्रोम
मेटाबॉलिक सिंड्रोम

मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय?

सिंड्रोम एक वैद्यकीय परिस्थिती आणि लक्षणांचे एकत्रीकरण आहे जे एकत्रित घडून येतात आणि एका विशिष्ट रोग किंवा स्थितीचे वर्णन करतात. मेटाबॉलिक सिंड्रोम ही एक अशी स्थिती आहे जिथे उच्च रक्तदाब, उच्च ट्रायग्लिसरायड पातळी, मधुमेह आणि लठ्ठपणा एकत्र येतो, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

त्याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

मेटाबॉलिक सिंड्रोम चे चिन्हं आणि लक्षणं इतके विशिष्ट आणि स्पष्ट नाही आहेत. मेटाबॉलिक सिंड्रोम ग्रस्त व्यक्तीचे सर्वात प्रमुख आणि सामान्य चिन्हे हे आहेत:

  • दीर्घ कालावधीसाठी वाढलेला रक्तदाब.
  • व्यक्तीचा कमरेचा घेर वाढणे.
  • मधुमेहाचे लक्षण आणि आवर्त संसर्ग यांसारख्या इंसुलिन प्रतिरोधन, तहान आणि भूक वाढणे, वजन वाढणे, सतत लघवीला येणे आणि इतर.

मुख्य कारणं काय आहेत?

मेटाबॉलिक सिंड्रोमचा मुख्य कारण लठ्ठपणा आणि शारीरिकरित्या क्रियाशील असण्याचा अभाव आहे. खालील कारणांमुळे मेटाबॉलिक सिंड्रोम होऊ शकतो:

  • उच्च रक्तदाब.
  • इंसुलिन प्रतिरोध हा आनुवंशिक आणि प्रकार 2 मधुमेहाचा मुख्य कारण आहे.
  • गर्भधारणेदरम्यान मधुमेह किंवा उच्च रक्तदाब विकसित होणाऱ्या महिलांमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम देखील होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

एखाद्या व्यक्तीमध्ये खालील चिन्हे दिसतात तेव्हा मेटाबॉलिक सिंड्रोमचे निदान मानले जाते:

  • रक्तातील कोलेस्टेरॉलची उच्च पातळी - कोलेस्टेरॉल सामग्री शोधण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते.
  • हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्त दाब) - 140/90 मि.मी. एचजी किंवा जास्त दीर्घकाळ असणारा रक्तदाब हे मेटाबोलिक सिंड्रोमचा धोका वाढवते.
  • लठ्ठपणा - पुरुषांमधील 94 सें.मी. किंवा त्याहून अधिक व महिलांमध्ये 80 सें.मी. किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढलेली कंबर असामान्य चयापचयचा संकेत आहे.
  • रक्तातील उच्च ग्लूकोज पातळी.

मेटाबॉलिक सिंड्रोम नियंत्रित करण्यासाठी लोक अनेक सवयी आणि जीवनशैली बदलू शकतात. यापैकी काही आहेत:

  • धूम्रपान सोडणे - धूम्रपान हृदयविकाराचा रोग, स्ट्रोक, कर्करोग आणि इतर रोगांचा धोका वाढवतो.
  • नियंत्रित आहार - जास्त खाणे आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी आहार नियंत्रित केला पाहिजे.
  • शारीरिक क्रियाकलाप वाढवा - सक्रिय आणि स्वस्थ जीवनशैली स्वीकारणे ही लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक जीवघेणा परिस्थितीस प्रतिबंध करणारी प्रमुख गोष्ट आहे. मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, उच्च ट्रायग्लिसरायड्स तसेच इंसुलिन प्रतिरोधनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वजन कमी करणे महत्वाचे आहे.

या स्थितीचा उपचार म्हणजेच प्रतिबंध करण्यासाठीचं पाऊल आहे. याव्यतिरिक्त, काही औषधे कोणत्याही स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील सादर केली जातात ज्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोमच्या दीर्घकालीन प्रभावांचा पूर्णपणे वाढ होऊ शकते. रक्तातील साखरेची पातळीची वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन शॉट देखील सुचवले जाऊ शकतात. कमी रक्तदाबासाठी रक्तदाब कमी करणारी औषधे सुचवली जातील.



संदर्भ

  1. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Metabolic syndrome.
  2. American Heart Association, American Stroke Association [internet]: Texas, USA AHA: About Metabolic Syndrome
  3. National Health Service [Internet]. UK; Metabolic syndrome.
  4. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Metabolic Syndrome.
  5. Kaur J. A comprehensive review on metabolic syndrome. Cardiol Res Pract. 2014;2014:943162. PMID: 24711954

मेटाबॉलिक सिंड्रोम चे डॉक्टर

Dr. Narayanan N K Dr. Narayanan N K Endocrinology
16 Years of Experience
Dr. Tanmay Bharani Dr. Tanmay Bharani Endocrinology
15 Years of Experience
Dr. Sunil Kumar Mishra Dr. Sunil Kumar Mishra Endocrinology
23 Years of Experience
Dr. Parjeet Kaur Dr. Parjeet Kaur Endocrinology
19 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

मेटाबॉलिक सिंड्रोम साठी औषधे

Medicines listed below are available for मेटाबॉलिक सिंड्रोम. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.