लठ्ठ असणें म्हणजे काय
लठ्ठ: हे शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनात एक “जाड व्यक्तीची’’ प्रतिमा उभरते, जिला दुहेरी हनुवट्या असतील, खूप कॅलॉरी असतेल आणि तो शक्यतो काही शारीरिक हालचाली करण्यास असमर्थ असेल. हीच आपली नैसर्गिक प्रतिक्रिया नव्हे का? हो, नक्कीच लठ्ठ म्हणजे अधिक वजन, पण आपल्या सर्वांना हे माहीतच असेल असे नाही की हे वैद्यकीय समस्या आहे, जी शरिराच्या विविध भागांत शरिरातील चरबी असामान्यपणें जमल्याने येते ज्यामुळे शरिराचे वजन खूप वाढते आणि तिचे एकूण आरोग्यावर अनेक दुष्प्रभावे होतात.
तुम्ही हे निर्धारित कसे कराल की एखादी व्यक्ती अधिक वजनाची किंवा लठ्ठ आहे? उत्तर आहेः शरीर-भार सूचकांक. शरीर-भार सूचकांक एक सांख्यिकीय आकडा आहे, ज्याचे गणन तुमच्या उंची आणि वजनाच्या आधारे केले जाते. शरीर-भार सूचकांक मोजमाप एखाद्या व्यक्तीच्या लठ्ठपणाची गणना करण्यासाठी एक उपयोगी सूचक असू शकते.एखाद्या व्यक्तीचे वजन गरजेपेक्षा 20% असल्यास तिला लठ्ठ समजले जाते. तुमचे शरीर-भार सूचकांक 25 आणि 29.9 यांच्यामध्ये असल्यास, तुम्हाला अती वजनाचे समजले जाईल. तुमचे शरीर-भार सूचकांक 30 किंवा अधिक असल्यास, तुम्हाला लठ्ठ समजले जाईल.
तुमचे शरीर-भार सूचकांक 25पेक्षा अधिक असल्यास, तुम्ही वजन कमी करण्याच्या कार्यक्रमांचा विचार केला पाहिजे आणि शरीर-भार सूचकांक 30 पेक्षा अधिक असल्यास, तुम्ही वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून सल्ला घेण्याचा गंभीरपणें विचार करावा. हे महत्त्वाचे आहे, कारण लठ्ठपणामुळे इतर वैद्यकीय अवस्था उदा. मधुमेह, कॉरॉनरी हृदयरोग, अतीतणाव, बाधाकारक निद्राविकार, सांध्यांचे ऑस्टिओआर्थरायटीस इ. यांची शक्यता होण्याचा किंवा वाढण्याचा धोका असतो. ही अवस्था हाताळण्यातील पहिला टप्पा म्हणजे तुमच्या लठ्ठपणाचे मूळ कारण शोधून काढणें. तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनशैलीचे निरीक्षण किंवा डॉक्टर अगर पोषणतज्ञाच्या सल्ल्याद्वारे हे साध्य करू शकता.
तुम्हाला हे माहीत होते का?
तुमच्या कंबरेचे व्यास तुमच्या आरोग्याचे निर्धारण करणारे एक महत्त्वाचे घटक आहे. तुम्ही पुरुष असून तुमच्या कंबरेचे माप 94 सें.मी. (37 इंच) किंवा अधिक आणि तुम्ही स्त्री असून तुमच्या कंबरेचे माप 80 सें.मी. (31.5 इंच) किंवा अधिक असल्यास, तुमचे आरोग्य धोक्यात आहे.
लठ्ठ असल्याने तुम्हाला अस्वस्थता वाटू शकते आणि तुमच्या दैनंदिन जीवनांत अडथळे येऊ शकतात. तुम्हाला श्वास गेल्यासारखे वाटू शकते आणि तुम्हाला चालणें किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहणेंही अवघड होऊ शकते. तुमच्या शरिराच्या मापात बसणारे कपडेही मिलणें अवघड होऊ शकते. लठ्ठ लोकांना खूप कमी काम करूनही खूप घाम येऊ शकतो. तसेच, तुम्ही लठ्ठ असल्यास, तुमच्या संवेदनांवरही प्रभाव पडू शकतो.तुमचे स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमी होऊ शकते. लोकांनी नकारात्मकरीत्या तुमच्या लठ्ठपणावर बोट ठेवल्याने, तुम्हाला नकोशी, अपराधभावना,लाज आणि हेच नाही,तर अवसादही जाणवू शकतो. या सामाजिक दोषभावनांवर मात करण्यासाठी, आम्ही पुढील भागांमध्ये लठ्ठपणाची कारणे आणि निवारण यांबद्दल माहिती देऊ, जेणेकरून या स्थितीत बाहेर पडून एक निरोगी जीवन जगू शकाल.