स्वादुपिंडाचा दाह म्हणजे काय?
पाचक एनझाईम आणि हार्मोन हे स्वादुपिंडद्वारे स्त्रावित केले जातात. कधीकधी, पाचक एनझाईम्स स्वादुपिंडाच्या अंतर्गत थरांना नुकसान पोहोचवतात त्यामुळे त्यावर सूज येऊ शकते आणि या रोगनिदानविषयक स्थितीला स्वादुपिंडाचा दाह म्हणून ओळखले जाते. हे अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकते. स्वादुपिंडाचा दाह हे पाचन विकारांमधे जास्त सामान्य नाही आहे आणि त्यामुळे रुग्णालयात तात्काळ वैद्यकीय दक्षतेची आवश्यकता असते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:
- पोटाच्या वरच्या भागात पाठीत गंभीर वेदना.
- फुगलेले पोट.
- मळमळ.
- तीव्र हृदयाचे ठोके.
- उलटी.
- ताप.
- अतिसार.
- वजन कमी होणे.
- श्वास घेता न येणे.
- स्वादुपिंड किंवा पित्त मूत्राशय नलिका (गाल ब्लॅडर डक्त) अवरोधित करणे.
- कोसळणे.
- जास्त प्रमाणात घाम येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
स्वादुपिंडाच्या दाह ची सामान्य कारणं आहेत :
- मद्यपान करणे.
- पित्त मूत्राशय (गाल ब्लॅडर) मध्ये खडे (स्टोन).
- स्वादुपिंडाच्या आनुवांशिक समस्या.
- पोटाला जखम.
- स्वादुपिंडाचा कर्करोग.
- हायपरग्लासेमिया आणि हायपरट्रायग्लिसरायडेमिया
- गालगुंड (मम्प्स).
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
स्वादुपिंडाच्या दाह चे 2 प्रकार आहेत - अल्पकालीन आणि दीर्घकालीन. अल्पकालीन स्वादुपिंडाचा दाह तेव्हा होतो जेव्हा पोटामध्ये अचानक आणि गंभीर दुखापत होत असते. यामुळे किडनी किंवा हृदय निकामी पडू शकते. दीर्घकालीन स्वादुपिंडाचा दाह जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने होत असते. हे बऱ्याच काळानंतर घडते आणि सुधारणा होण्याची आणि उपचारांची शक्यता सामान्यतः खूप कमी असते. निदानाची पुष्टी करण्यासाठी तपासणीच्या मालिकेसह शारीरिक तपासणी केली जाते.
स्वादुपिंडाच्या दाह चे निदान केले जाते :
- एमआरआय (MRI) स्कॅन - नलिकांच्या प्रतिमेचे निरीक्षण केल्यानंतर हे डॉक्टरांना रोगाचे वास्तविक कारण देते.
- पोटाचे अल्ट्रासाऊंड- हे पित्त मूत्राशय (गॉल ब्लॅडर) मध्ये खडे (स्टोन) शोधण्यात मदत करते
- सीटी स्कॅन - हे ग्रंथीच्या 3-डी प्रतिमा घेण्यास मदत करते
- एक्स-रे सारख्या आणखी काही चाचण्या आणि अमायलेझ पातळीवरील रक्त तपासण्या देखील स्वादुपिंडाच्या दाहच्या निदानची पुष्टी करण्यासाठी केल्या जातात.
निदानानंतर याचे उपचार विविध पद्धतींनी केले जातात जसे की :
- शस्त्रक्रिया - सहसा, खड्यांची (स्टोन) मिळाल्यानंतर पित्त मूत्राशय (गॉल ब्लॅडर) काढून टाकले जाते. परत, तसेच, शक्य असल्यास, स्वादुपिंडाच्या जखमी भागाला देखील काढले जातात.
- एन्डोस्कोपी- पित्त मूत्राशय खडे (गॉल ब्लॅडर स्टोन) काढण्यासाठी
- इंट्राव्हेनस फ्लुईड्स (शिरेच्या आत दिले जाणारे द्रव)- हे सूज सुलभ करण्यात मदत करते.
- वेदना कमी करण्यासाठी अॅनलजेसिक्स (वेदना मुक्त करणारे).
जीवनशैलीतील बदल जे डिसचार्जनंतर केलेच पाहिजेत आणि रुग्णालयात एकदा अल्पकालीन स्वादुपिंडाचा दाह नियंत्रित केले गेले आहेत ते आहेत:
- मद्यपान करणे सोडणे.
- चरबीयुक्त अन्न टाळणे.