मासिक पाळीच्या समस्या - Period problems in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 09, 2019

March 06, 2020

मासिक पाळीच्या समस्या
मासिक पाळीच्या समस्या

मासिक पाळीच्या समस्या काय आहे?

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातला सामान्य घटक आहे जो प्रत्येक महिन्याला येतो . कीशोरावस्थेच्या सुरुवातीला मासिक पाळी सुरू होते, वयाच्या 10 -12 व्या वर्षांपासून सुरु होऊन फक्त गर्भधारणा, स्तनपान, किंवा रजोनिवृत्ती सोडली तर हे नियमीत सुरु असते. अनियमित मासिक पाळी असेल तर मासिक पाळीच्या समस्या सुरू होतात ज्या आहेत:

  • अमेनोऱ्हिया (मासिक पाळीत रक्तस्त्राव न होणे).
  • डिस्मेनोर्हेया (वेदनादायक रक्तस्त्राव).
  • ऑलिगोमेनोऱ्हिया (अनियमित रक्तस्त्राव).
  • मेनॉरहाजिया (रक्तस्त्राव खूप जास्त होणे).

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मासिक पाळीच्या समस्येचे लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

  • वेदना.
  • क्रॅम्पस.
  • डोकेदूखी.
  • ब्लॉटिंग.
  • कमी किंवा जास्त रक्तप्रवाह.
  • अनियमित रक्तस्त्राव.

याचे मुख्य कारणे काय आहेत?

सामान्य मासिक पाळी हे तुमच्या निरोगी पुनरुत्पादक आरोग्याचे लक्षण आहे. ऋतुप्राप्ती च्या वेळेस, सुरवातीच्या काही महिन्यांसाठी मासिक पाळी अनियमित असू शकते, तरीही, नंतर सायकल नियमित होऊन 22 -31 दिवस पर्यंत चालते. खाली दिलेली कारणे मासिक पाळीच्या समस्या वाढवतात:

  • पॉली सिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी): अंडाशयात सिस्ट असणे.
  • एन्डोमेट्रिओसिस: एन्डोमेट्रियल टिशूची  गर्भाशयाच्या बाहेरील भिंतीवर वाढ होते जे पिरेड मध्ये बाहेर पडते.
  • हार्मोनल इंबेलन्स.
  • गर्भाशयात गाठी तयार होणे.
  • इन्ट्रायुटेराइन डिव्हाईस (आययूडी).
  • हार्मोन च्या गोळ्या.
  • थायरॉईड प्रॉब्लेम.
  • रक्त गोठण्याचा विकार.

याचे निदान आणि उपचार काय आहेत?

जर तुम्हाला मासिक पाळी संबंधित काही समस्या असतील, तर तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांकडून सल्ला घेतला पाहिजे, कारण उपचार न झालेल्या मासिक पाळीच्या समस्येमूळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते. निदान खालील प्रकारे करण्यात येते:

  • मासिक पाळीचा पूर्ण इतिहास.
  • शारीरिक तपासणी.
  • गर्भाशयाची आतून तपासणी.
  • हॉर्मोन ची रक्तातून तपासणी.
  • मूत्र विश्लेषण.
  • अल्ट्रासाउंड इमेजिंग.
  • एन्डोमेट्रियल बायोप्सी.
  • हिस्ट्रोस्कोपी (गर्भाशयातील आतील बाजू तपासणे).

लक्षणे आणि कारणे दोन्ही बरे होण्यासाठी, मासिक पाळीच्या समस्येवर लवकर उपचार मिळणे आवश्यक आहे. खालील उपचार पद्धती उपलब्ध आहेत:

  • हार्मोनल उपचार.
  • प्लास्मिनोजेन सक्रियक प्रतिबंधक जे ब्लड क्लॉट होण्यापासून थांबवते आणि जास्त रक्तस्रावा वर नियंत्रण ठेवते.
  • वेदना कमी करण्यासाठी स्टेरॉइड नसलेले दाहनाशक औषधे (एनएसएआयडीएस) घेणे.
  • ब्लीडींग थांबायसाठी हिमोस्टॅटिक्स.
  • स्वतःची काळजी घेणे जसे वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याची पिशवी वापरणे.
  • मासिक पाळी मध्ये कंबरेच्या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी व्यायाम करणे.

सामान्य मासिक पाळी आणि घटना, ज्या साधारणपणे मासिक पाळी च्या काळात होतात समजून घेणे आवश्यक आहे. लक्षात घ्या तुमच्या स्त्रीरोगतज्ञांकडून नियमित तपासणी केल्याने तुम्ही मासिक पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी मदत मिळेल आणि भविष्यात जास्त गुंतागुंत होणार नाही.



संदर्भ

  1. Williams C.E. and Creighton S.M. Menstrual Disorders in Adolescents: Review of Current Practice. Horm Res Paediatr 2012;78:135–143. PMID: 23051587
  2. Rostami Dovom M et al. Menstrual Cycle Irregularity and Metabolic Disorders: A Population-Based Prospective Study. PLoS One. 2016 Dec 16;11(12):e0168402. PMID: 27992506
  3. Amanda Daley. The role of exercise in the treatment of menstrual disorders: the evidence. Br J Gen Pract. 2009 Apr 1; 59(561): 241–242. PMID: 19341553
  4. Luis Bahamondes,Moazzam AliLuis Bahamondes. Recent advances in managing and understanding menstrual disorders. F1000Prime Rep. 2015; 7: 33. PMID: 25926984
  5. Ganesh Dangal. Menstrual disorders in adolescents. journal of the Nepal Medical Association 43(153) · January 2004

मासिक पाळीच्या समस्या चे डॉक्टर

Dr. Nishi Shah Dr. Nishi Shah General Physician
6 Years of Experience
Dr. Samadhan Atkale Dr. Samadhan Atkale General Physician
2 Years of Experience
Dr.Vasanth Dr.Vasanth General Physician
2 Years of Experience
Dr. Khushboo Mishra. Dr. Khushboo Mishra. General Physician
7 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

मासिक पाळीच्या समस्या साठी औषधे

Medicines listed below are available for मासिक पाळीच्या समस्या. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.