रिकेट्सियल इन्फेक्शन म्हणजे काय?
बॅक्टेरियाच्या गटामुळे होणारा संसर्ग, जो माइट्स, माश्या, टिक्स, किंवा उवा चावल्याने माणसांमध्ये प्रसारित होऊ शकतो, याला रिकेट्सिया म्हणतात. जेव्हा मानवी शरीराच्या उवा रिकेट्सिया प्रोवाझेकी (इपिडेमिक टायफस) पसरवतात तेव्हा रिकेट्सियल रोगाचा उद्रेक दिसून येतो. या संसर्गामध्ये व्यक्ती-ते-व्यक्ती प्रसारण उद्भवत नाही. रिकेट्सिया प्रजाती ज्या माणसांमध्ये संसर्ग उद्भवण्यास सक्षम आहेत (जे दुर्मिळ आहे) आणि ज्या ऑस्ट्रेलियामध्ये सापडतात त्या खालीलप्रमाणे आहेत :
- रिकेट्सिया टायफी - म्युरिन टायफस.
- रिकेट्सिया ऑस्ट्रेलिस - क्वीन्सलॅन्ड टिक टायफस.
- रिकेट्सिया होनै - फ्लिन्डर्स आयलन्ड स्पाॅटेड फिवर.
- ओरिएन्शिया त्सुत्सुगामुशी - स्क्रब टायफस.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
संसर्गाची लक्षणे आणि तीव्रता व्यक्ती-व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात बदलते. अति सामान्यपणे आणि विशेषतः उद्भवणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- संसर्गाच्या सुरूवातीच्या ठिकाणी (चावलेल्या जागी), एक लहान, कडक, काळा पुरळ(इश्चर) दिसतो.
- खोकला.
- डोकेदुखी.
- ताप.
- पुरळ.
- स्नायूंमध्ये वेदना.
- लिम्फ ग्रंथीमध्ये सूज.
क्वचितच, श्वास घेण्यात अडचणी आणि गोंधळ दिसून येतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
रिकेट्सियल इन्फेक्शनची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- जसजसे टिक्स आणि माइट्स माणसावर आहार घेतात, जेव्हा ते चावतात त्यांची लाळ थेट संसर्ग प्रसारित करू शकते.
- माश्यांच्या बाबतीत, चावण्याचे ठिकाण हे विष्ठेनी दूषित होते.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
रिकेट्सियल इन्फेक्शन हे असामान्य आणि दुर्मिळ असल्यामुळे, बरेचदा, त्यांचे निदान करणे कठीण होते. डाॅक्टर चिन्हे आणि लक्षणांचा तपशीलवार इतिहास घेतात, जे निदान करण्यात मदत करते. निश्चित निदानासाठी डाॅक्टर खालील चाचण्यांचा सल्ला देऊ शकतात :
- रक्त चाचणी.
- चावलेल्या जागेतील त्वचेचा नमुना वापरून स्किन बायोप्सी.
रिकेट्सियल इन्फेक्शनचे उपचार खालीलप्रमाणे केले जातात:
- चावलेल्या त्वचेची तपासणी ( विशेषतः मांडीच्या सांध्याच्या भागात, काखेत, कान किंवा गुडघ्याच्या मागे, डोक्याच्या मागे) जेणेकरून ते व्यवस्थापित केले जाऊ शकेल आणि पिकारिडिन यासारख्या कीटकनाशकांचा वापर किंवा लांब-बाहीच्या संरक्षक कपड्यात आणि रूंद कड्याची टोपी यामध्ये शरीर संरक्षित ठेवणे.
- प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही लस नसल्यामुळे, संसर्गाचा कालावधी आणि तीव्रता कमी करण्यासाठी, टेट्रासिलिन किंवा डाॅक्सिसिलिन सारखे ॲन्टीबायोटीक्स लिहून दिले जातात.
- सार्वजनिक ठिकाणाहून प्रभावित व्यक्तीस अलिप्त ठेवणे.