टिनिया व्हर्सिकलर काय आहे?
टिनिया व्हर्सिकलर, याला पिटीरियासिस व्हर्सिकलर म्हणूनही ओळखले जाते, ही एक अशी स्थिती आहे, ज्यात मलॅसिझिया बुरशी, सामान्यतः त्वचेच्या पृष्ठभागावर आढळते, ती त्वचेवर नियंत्रणा बाहेर पसरते आणि त्वचा प्रभावित करते. या स्थितीत, हलक्या किंवा गडद रंगाचे पॅच त्वचेवर दिसतात, सामान्यत: मान, छाती, पाठ आणि हातांवर. ही स्थिती हानिकारक नाही पण नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बरे करण्यासाठी औषधोपचाराची गरज भासू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
टिनिया व्हर्सिकलर विकसित होण्याची निश्चित आणि ठोस चिन्हे आहेत त्वचेवर फिकट पॅच दिसणे. हे पॅच सामान्यत: त्वचेच्या रंगापेक्षा फिकट असतात परंतु ते गडद, गुलाबी, लालसर किंवा तपकिरी देखील असू शकतात. काही प्रकरणांमध्ये, पॅच कोरडे आणि खवल्यांसारखे असू शकतात त्यामुळे खाज येते. हा संसर्ग सामान्यत: शरीराच्या अशा भागांवर होतो जिथे घाम येतो जसे ग्रॉइन, काखेत, स्तनाखाली, जेथे त्वचा दुमडली जाते जसे पोट, मांडी, मान आणि पाठ.
याची मुख्य कारणं काय आहेत?
टिनिया व्हर्सिकलर विकसित होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यक्तीच्या निवासस्थानाजवळील पर्यावरणीय आणि जैविक घटक. आर्द्र किंवा उबदार वातावरणामुळे जास्त घाम येतो यामुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते. टिनिया व्हर्सिकलरची इतर कारणे ही आहेत:
- टिनिया व्हर्सिकलरचा कौटुंबिक इतिहास.
- नशेच्या औषधांचा दुरुपयोग जी प्रतिकार यंत्रणा कमकुवत करतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
प्रभावित क्षेत्राची शारीरिक तपासणी स्थितीचे निदान करण्यात मदत करू शकते; पण, क्वचितच निश्चित निदानासाठी डॉक्टर अनेक चाचण्या करण्यास सांगतात:
- बुरशीच्या वाढीसाठी स्किन स्क्रॅपिंग आणि चाचणी.
- वुड लॅम्पच्या चाचणीसारख्या फंगल वाढीसाठी लॅब चाचण्या.
स्थितीवर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि बरे करण्यासाठी डॉक्टर अँटी-फंगल गोळ्या आणि वैयक्तिक देखभालीसाठी उत्पादने जसे अँटी-फंगल लोशन आणि अँटी-फंगल शॅम्पू लिहून देऊ शकतात. सामान्यत: या उत्पादनांमध्ये केटोकोनाझोल, परमेथ्रीन आणि इतर औषधे असतात. वैयक्तिक स्वच्छता राखणे जसे सैल कपडे घालणे, साबण आणि पाणी वापरून दिवसातून दोनवेळा आंघोळ करणे आणि जलद रोगमुक्त होण्यासाठी आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्वचा कोरडी राखणे महत्वाचे आहे.