टॉक्सोप्लाझोमॉसिस म्हणजे काय?
टॉक्सोप्लाझोमॉसिस हा सामान्यतः टॉक्सोप्लाझ्मा गोंडी नावाच्या एक परजीवीमुळे होणारा संसर्ग आहे. हा परजीवी अनेक प्राणी आणि पक्षी, विशेषत: मांजरींमध्ये आढळतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
या संसर्गा मध्ये कोणतेही लक्षणे दिसून येत नाही. पण, ते उद्भवल्यास लक्षणे व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीनुसार बदलतात. व्यक्तीमध्ये चांगली प्रतिकार शक्ती असल्यास खालील लक्षणे असतात:
कमी प्रतिकार शक्तीच्या व्यक्तींमध्ये खालील लक्षणे दिसतात:
- दौरे पडणे.
- तीव्र डोके दुखी.
- दृष्टी संबंधित समस्या.
- मानसिक गोंधळ.
याची मुख्य कारणं काय आहेत?
खालील कारणांमुळे टॉक्सोप्लाझोमॉसिस होतो:
- हे परजीवी बऱ्याच प्राण्यांच्या प्रजातींमध्ये उपस्थित असतात आणि म्हणूनच व्यवस्थित न शिजवलेले मांस खाल्याने संक्रमण होऊ शकते.
- दूषित पाण्याचा वापर केल्यास हे परजीवी मानवी शरीरात प्रवेश करू शकतात.
- संसर्गित मांजरीच्या मलाशी संपर्क झाल्यास संसर्ग होऊ शकतो.
- काही प्रकरणांमध्ये संसर्ग झालेल्या मातेपासून जन्म न झालेल्या बाळाला (जन्मजात संचरण) किंवा संसर्गित रक्त चढवल्याने होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
टॉक्सोप्लाझोमॉसिसचे निदान करण्यासाठी, पुढील चाचण्या केल्या जाऊ शकतात:
- परजीवी विरुद्ध अँटीबॉडीज बघण्यासाठी रक्त तपासणी
- सीटी स्कॅन
- एमआरआय स्कॅन
- बायोप्सी
- परजीवी शोधण्यासाठी मलची तपासणी
निदानाची पुष्टी झाल्यानंतर, डॉक्टर अँटीहेलमेनथिक्स नावाच्या अल्बेंडाझोल सारख्या औषधांच्या मदतीने संसर्ग हाताळले जातात. पण, बऱ्याच लोकांमध्ये, काही उपचारांशिवाय लक्षणे निघून जातात.
कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांमध्ये औषधे अनिवार्य असतात. हा संसर्ग कोणत्याही प्रकारची गंभीरता न झाल्यास उपचारांनी सहजतेने बरा होतो.
संसर्ग टाळण्यासाठी, व्यवस्थितपणे शिजवलेले मांस खाणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि मांजरीचा कचरा हाताळताना स्वच्छता राखणे गरजेचे आहे. संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी कच्चे मांस हाताळल्यानंतर साबण आणि पाण्याने हात धुणे आवश्यक आहे.