पिवळा ताप काय आहे?
हा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे जो मच्छर, एडीस इजिप्तीमुळे होतो. हा प्रामुख्याने आफ्रिका आणि मध्य व दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो. याला येलो जॅक किंवा येलो प्लेग म्हणून देखील ओळखले जाते. पिवळ्या तापाचा संसर्ग झालेल्या डासांच्या चावण्याने पिवळा ताप येऊ शकतो. काही व्यक्तींमध्ये काविळीची चिन्हे दिसतात-त्वचेचा रंग आणि डोळ्याच्या पांढऱ्या भागाचा रंग पिवळा होतो; म्हणून याला 'पिवळा' म्हटले जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
पिवळ्या तापाच्या स्थितीवर आधारित लक्षणे याप्रकारे वर्गीकृत केली जाऊ शकतात :
- भूक न लागणे, ताप, कावीळ, फ्लशिंग, डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायूत वेदना, फ्लशिंग, आणि उलट्या होणे हे सर्वसामान्य लक्षणं पहिल्या टप्प्यात अनुभवले जातात.
- कधीकधी पहिल्या टप्प्यातले लक्षणे गायब होतात आणि बरेच लोक बरे होतात. परंतु काही प्रकरणांमध्ये, 24 तासांनंतर लक्षणे पुन्हा दिसतात.
- यकृत, हृदय आणि किडनी यांच्या समस्या; रक्तस्त्रावाचे विकार; कोमा; मलामध्ये रक्त; चित्तभ्रम;, डोळे, तोंड आणि नाकातून रक्तस्त्राव हे तिसऱ्या टप्प्यातले गंभीर लक्षणं आहेत.
याची मुख्य कारणं काय आहेत?
संक्रमित डासांच्या चाव्याने पिवळा ताप येतो. एखाद्या व्यक्तीला डास चावल्यानंतर तीन ते सहा दिवसांनी लक्षणं दिसू लागतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सामान्यतः रोगाची लक्षणे बघण्यासाठी शारीरिक तपासणी केली जाते. पिवळ्या तापाचे इतर लक्षणे तुमच्यात आढळतात का ते तपासण्यासाठी डॉक्टर तुम्हाला अनेक प्रश्न विचारू शकतात. जर डॉक्टरांना पिवळा ताप आला आहे या निदानाची पुष्टी करायची असेल तर ते रक्त तपासणी करायला सांगू शकतात. रक्त तपासणीत यकृत आणि किडनीसारखे अवयव निकामी झाले असतील तर ते देखील लक्षात येते.
यासाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत, परंतु सामान्यत: निर्धारित लक्षणांच्या उपचार पद्धतींमध्ये हे समाविष्ट असतात:
- तीव्र रक्तस्त्राव झाल्यास रक्त आणि रक्तातील घटकांचे ट्रान्सफ्युजन.
- संसर्गित किडनी निकामी झाल्यास डायलिसिस.
- निर्जलीकरण टाळण्यासाठी किंवा द्रवाच्या हानीची भरपाई करण्यासाठी नसांतून द्रव देणे.
पिवळ्या तापाच्या प्रवण क्षेत्रात प्रवास करण्यापूर्वी लस घेऊन पिवळा ताप टाळता येऊ शकतो.