लिव्हर सिरोसिस - Liver Cirrhosis in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

January 03, 2019

March 06, 2020

लिव्हर सिरोसिस
लिव्हर सिरोसिस

लिव्हर सिरोसिस म्हणजे काय?

लिव्हर सिरोसिस ही अशी स्थिती आहे की, ज्यामध्ये यकृत बऱ्याच काळापासून नुकसान झाल्यामुळे खराब होते. यकृत छोटे होऊन कडक होते. त्यामुळे नीट काम करू शकत नाही व शेवटी काम करणे थांबवते. ही स्थिती यकृताला होणाऱ्या रक्त पुरवठ्यावर देखील परिणाम करते व पोर्टल हायपरटेन्शन होते.

सिरोसिस हा पसरणारा आजार आहे आणि निरोगी टिश्यू फायब्रस बँड्स ने बदलले जातात. नैसर्गिक अडचणींशी लढायला यकृतात गाठी तयार होतात व सर्व पृष्ठभाग व्यापतात. हे स्कार टिश्यू रक्तप्रवाह यकृतापर्यंत पोहोचू देत नाही ज्यामुळे यकृताचे काम पूर्ण बंद होऊन मृत्यूच्या धोका संभवतो .

याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?

ह्या स्थितीची सुरुवातीची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

याच्या पुढच्या टप्प्यांमध्ये खालील लक्षणे दिसतात:

याची मुख्य कारणं काय आहे?

लिव्हर सिरॉसिस ची कारणे खालीलप्रमाणे:

  • हिपॅटायटीस बी किंवा सी सारखे व्हायरल इन्फेक्शन.
  • निरंतर दारू सेवन.
  • फॅटी लिव्हर आजार.
  • लठ्ठपणा.
  • सिस्टिक फायब्रोसिस.
  • उच्च रक्तदाब.
  • ऑटोइम्युन आजार जसे, ऑटो इम्यून हेपॅटायटीस.
  • अन्ननलिकेत अडथळा.
  • हर्बल प्रिपरेशन ज्यामुळे यकृताला धोका निर्माण होतो.
  • केमिकल्सशी संपर्क.
  • हृदयाचे काम बंद होणे.
  • यकृतामध्ये फंगस चा संसर्ग.
  • यकृताचे अनुवांशिक आजार.
  • शरीरात कॉपर व आर्यनचे जास्त प्रमाण.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

डॉक्टरांकडून ह्या स्थितीचे खालील प्रमाणे निदान केले जाते:

  • यकृताचे काम तपासण्यासाठी रक्त तपासण्या.
  • लिव्हर बायोप्सी.
  • एम आर आय स्कॅन.
  • अन्ननलिकेच्या वरच्या भागाची एन्डोस्कोपी.
  • सी टी स्कॅन.
  • अल्ट्रासाऊंड.

वरील पद्धती मधून ह्या स्थितीचे कॉम्प्लिकेशन्स लक्षात येतात. चाइल्ड्स पग चाचणी च्या स्कोअर वरून स्थितीचे वर्गीकरण केले जाते:

  • गंभीर.
  • मध्यम.
  • सौम्य.

सिरोसिसमुळे झालेल्या नुकसानावर आधारित, त्याचे कॉपेंसेटेड व डीकॉपेंसेटेड मध्ये वर्गीकरण केले जाते. कॉपेंसेटेड सिरोसिस मध्ये यकृताचे कार्य चालू राहते. डीकॉपेंसेटेड सिरोसिस यकृताच्या आजारातील शेवटच्या टप्प्यात दिसून येते.

सिरोसिस दारूचे सेवन थांबवून किंवा व्हायरस वर उपचार करून बरे करता येऊ शकते. ह्या स्थितीचा उपचार नेहमी स्कार टिश्यू चे वाढणे कमी करतो. स्थितीचा उपचार खालील गोष्टीनी केला जातो:

  • संतुलित आहाराचे सेवन.
  • जास्त सोडियम चे सेवन.
  • हिपॅटायटीस व्हायरस चा उपचार.
  • आर्यन व कॉपरचे कमी प्रमाणात सेवन.

गंभीर बाबतीत लिव्हर ट्रान्सप्लांट हा शेवटचा उपाय असतो. जर उपचार नाही केला तर कॉम्प्लिकेशन वाढून खालील त्रास होतात:



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Overview - Cirrhosis
  2. American liver Foundation. The Progression of Liver Disease. [Internet]
  3. Detlef Schuppan, Nezam H. Afdhal. Liver Cirrhosis. Lancet. Author manuscript; available in PMC 2009 Mar 8. PMID: 18328931
  4. The Johns Hopkins University. Chronic Liver Disease/Cirrhosis. [Internet]
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Cirrhosis

लिव्हर सिरोसिस साठी औषधे

Medicines listed below are available for लिव्हर सिरोसिस. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.