नाकामधील मुरुम म्हणजे काय?
मुरुम एक लहान पस झालेला फोड असतो जो अवरोधित सेबसियस ग्रंथी किंवा संक्रमित केसांची कूप झाल्यामुळे विकसित होतो. नाकांची गुहा असंख्य केसांच्या कूपांनी बनलेली असते आणि म्हणूनच मुरुमांची घटना असामान्य नाही. जरी पाहायला लाज्जास्पद नसले तरी, त्याने पीडित व्यक्तीसाठी त्याच्या वेदना खूप त्रासदायक असतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मुरुम साधारणतः लहान असतात आणि नाकांमधील काही लहान अडथळासारखे दिसतात जे अधूनमधून सौम्य वेदना देऊ शकतात. पण, जर मुरुमांना एखाद्या पोकिंग साधनांच्या स्पर्शाने संक्रमित केल्यास, त्यांचे प्युस्ट्यूल( पस झालेला फोड) आणि शेवटी फोड होऊ शकतात. हे फोड खूप वेदनादायक असू शकतात आणि नंतर पस सारखा डिस्चार्ज होऊ शकतो. खाज, लालसरपणा आणि प्रभावित क्षेत्रात उष्मा ही काही लक्षणे आहेत.
याची मुख्य कारणं काय आहेत?
संक्रमित केसांचा कूप, ज्याला फरंकल म्हणूनही ओळखले जाते, हे नाकातील मुरुमांच्या सामान्य कारणांपैकी एक आहे. इतर कारणांमधे, फॉलीक्युलिटिस म्हणला जाणाला सुजलेल्या केसांचा कूप, आणि सेल्युलायटिस जो त्वचेचा संसर्ग समजले जातात.एक मुरुम अंतर्वर्धित केसांमुळेहोऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लक्षणे दिसून आल्यावर तज्ञांकडून नाकाची पोकळी तपासून निदानाची पुष्टी होऊ शकते. बहुतेक मुरूम जेव्हा एकमेव असतात तेव्हा स्वतःच निराकरण करतात. मुरुमांना बरे होण्यासाठी 7-10 दिवसांचा कालावधी लागू शकतो. पण, जर पस तयार होत असेल किंवा ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपचारांमध्ये प्रामुख्याने 5 दिवसांच्या कालावधीसाठी अँटीबायोटिक्सचा समावेश असतो. बऱ्याच प्रकरणांत अँटीबायोटिक्स औषधासह निराकरण होते, पण काहींना पसला ड्रेनेज देण्याची गरज भासते. एक उपचार न केलेले संक्रमित मुरूम धोकादायक ठरु शकते कारण काही नाकातल्या शिरा मेंदूला जोडलेल्या असतात आणि त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या बनू शकतात. स्वत:ची काळजी घेणे म्हणजे वारंवार नाक खुडणे टाळणे, तज्ञाद्वारे केस काढून टाकणे, वेदना कमी करण्यासाठी उबदार संप्रेरकांचा वापर करणे आणि नारळाचे तेल आतमध्ये लावल्याने आराम मिळतो असे ज्ञात आहे.